Join us  

पाण्याची बेकायदेशीर विक्री

By admin | Published: April 11, 2015 10:31 PM

ठाणे महापालिकेच्या हद्दीत पाण्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा धक्कादायक आरोप सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनीच शुक्र वारच्या महासभेत केला.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीत पाण्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा धक्कादायक आरोप सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनीच शुक्र वारच्या महासभेत केला. सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीच असा आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतु प्रशासनाने अशी कोणत्याही प्रकारच्या पाण्याच्या विक्र ीची तक्र ार आपल्याकडे आली नसल्याची माहिती दिली आहे. कळवा येथील प्रभाग क्र मांक ५४ वाघोबानगर परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्याचा कार्यक्र म नुकताच महापौर संजय मोरे यांच्या हस्ते पार पडला. ही जलवाहिनी ज्या प्रभागात टाकण्यात येत आहे, तो प्रभाग राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अक्षय ठाकूर यांचा प्रभाग आहे. यापरिसरात पाण्याची टंचाई असून नवीन जलवाहिनी टाकण्यात यावी याबाबत अक्षय ठाकूर यांनी नऊ महिन्यापूर्वी पालिकेला पत्र दिले होते. परंतु त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप ठाकूर यांनी महासभेत केला. तसेच जी जलवाहीनी टाकण्यात येत आहे, तो भाग माझ्या प्रभागात येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या कार्यक्र मचे साधे निमंत्रणही मला देण्यात आले नव्हते असेही त्यांनी सांगितले. ४कळव्यात पाण्याची मोठी समस्या आहे. नागरिकांना पाणी नसल्याने त्यांचे हाल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील यांनी कळवा परिसरात मोठ्या प्रमाणात लुट करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकानेच थेट पाणी विक्र ीचा आरोप केल्याने संपूर्ण सभागृह अवाक झाले. पाटील यांच्या आरोपात तथ्य आहे का खरच असा प्रकार होतो आहे का असा प्रश्न सर्वपक्षीय सदस्यांनी विचारला. यावर अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे नसल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी रविंद्र खडताळे यांनी सांगितले.