Join us  

रोजगारक्षम पदवीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये ‘आयआयटी बॉम्बे’ पहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 6:09 AM

आयआयटी बॉम्बेने आपले स्थान कायम करीत विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सिद्ध केले आहे.

मुंबई : क्यूएस वर्ल्ड रँकिंग या जागतिक मानांकन संस्थेच्या रोजगारक्षम पदवी देणाऱ्या शैक्षणिक संस्था-२०२० च्या क्रमवारीत आयआयटी बॉम्बेने आपले स्थान कायम करीत विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सिद्ध केले आहे. क्यूएसच्या २०२० च्या या जागतिक क्रमवारीत आयआयटी बॉम्बे १११ ते १२० च्या क्रमवारीत असले तरी भारतात प्रथम क्रमांकाची शैक्षणिक संस्था होण्याचा मान पटकाविला आहे. भारतातील पदवीधर रोजगार मिळवून देणाºया संस्थांमध्ये मुंबई विद्यापीठाने सातवा क्रमांक पटकाविला आहे.गुरुवारी क्यूएस वर्ल्ड रँकिंगकडून कोणत्या शैक्षणिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना सर्वाधिक रोजगार प्राप्त करून दिला जातो याविषयीची जागतिक क्रमवारी जाहीर केली. या वर्षी क्यूएस संस्थेने रोजगारक्षम पदवी देणारी शैक्षणिक संस्था या विभागासाठी जगातील ७५८ शैक्षणिक संस्थांचे सर्वेक्षण केले. विशेष म्हणजे क्रमवारीतील पहिले तीन क्रमांक हे अमेरिकेतील शैक्षणिक संस्थांनी पटकाविले आहेत. मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ, स्टॅण्डफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ ही विद्यापीठे अनुक्रमे पहिल्या, दुसºया व तिसºया क्रमांकावर आहेत. आयआयटी बॉम्बेला क्रमवारीच्या १११-१२० या पट्ट्यात स्थान मिळाले असून आयआयटी बॉम्बेचा रँकिंग स्कोर १०० पैकी ५४-५५.१ इतका आहे. क्यूएस रँकिंगमध्ये जरी आयआयटी बॉम्बे ही संस्था पहिल्या शंभरीत नसली तरी भारतातील रोजगारक्षम पदवीसाठीची पहिल्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था ठरली आहे. मुंबई विद्यापीठातील भारतातील सातव्या क्रमांकाची संस्था होण्याचा मान मिळाला असून जागतिक क्रमवारीत २५१ ते ३०० च्या क्रमवारीत आहे.आयआयटी बॉम्बेच्या विविध विभागांचे तज्ज्ञ सदस्य आणि येथील दर्जेदार वातावरण यामुळे विद्यार्थ्यांनी जगामध्ये उद्योजकांची मने जिंकली आहेत. हे या क्रमवारीत दिसून येत आहे. आमचे प्रयत्न पुढेही कायम राहतील, असे आयआयटी बॉम्बेचे संचालक सुभाषिश चौधरी यांनी सांगितले.>क्यू एस रँकिंग म्हणजे काय?क्वॅकरेली सायमंड या शिक्षण क्षेत्रातील जाणकार ब्रिटिश कंपनीतर्फे जगभरातील विद्यापीठांची आणि शिक्षण संस्थांची वार्षिक क्रमवारी ‘क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ या वार्षिकांकात प्रसिद्ध केली जाते.