Join us  

कोणाला ट्रीट देत असाल, तर जर जपून; क्रेडिट आणि डेबिट कार्ड क्लोनिंग करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 4:43 AM

कोणाला ट्रीट देत असाल तर जरा जपून. ही ट्रीट तुम्हाला लाखांत पडू शकते. काॅफी शाॅपमध्ये स्वाइप करण्यासाठी दिलेले क्रेडिट अथवा डेबिट कार्डचे क्लोनिंग करणारी पाच जणांची टोळी खेरवाडी पोलिसांनी गजाआड केली.

 मुंबई - कोणाला ट्रीट देत असाल तर जरा जपून. ही ट्रीट तुम्हाला लाखांत पडू शकते. काॅफी शाॅपमध्ये स्वाइप करण्यासाठी दिलेले क्रेडिट अथवा डेबिट कार्डचे क्लोनिंग करणारी पाच जणांची टोळी खेरवाडी पोलिसांनी गजाआड केली. या पाच जणांनी बनावट कार्ड बनवून कोट्यवधी रूपये उकळल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.

बॅंक खात्यामधून परस्पर पैसे कमी होत असल्याच्या तक्रारी खेरवाडी पोलीस ठाण्यात येत होत्या. वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुनील यादव, सहायक निरिक्षक सचिन सुर्यवंशी, सोहन कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान फसवणूक झालेले बहुतांश तक्रारदार हे वांद्रे कुर्ला काॅम्पलेक्स येथील एका काॅफी शाॅपमध्ये जाऊन आल्याचे आढळले. तपासातील हाच दुवा पोलिसांना यामागील टोळीपर्यंत घेऊन गेला. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांवरून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. अक्रम मेहबूबअली शेख, फैझ करमहुसैन चौधरी, अल्ताफ आफताफ शेख, सरफराज समसुद्दीन शेख, राहुल देवनारायण यादव अशी या पाच जणांची नावे आहे. या पाच जणांना मुंबईच्या वेगवेगळ्या परिसरातून अटक करण्यात आल्याचे खेरवाडी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई