Join us  

खड्डे पडल्यास ४८ तासांत भरणार, पालिकेचा दावा; तक्रारीसाठी दिले व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 2:08 AM

मुंबईत रस्त्यांची कामे महापालिकेने मोठ्या प्रमाणात हाती घेतली तरी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, याची शाश्वती प्रशासनालाही नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे तत्काळ भरण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू झाली आहे.

मुंबई : मुंबईत रस्त्यांची कामे महापालिकेने मोठ्या प्रमाणात हाती घेतली तरी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, याची शाश्वती प्रशासनालाही नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे तत्काळ भरण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू झाली आहे. तसेच खड्ड्यांच्या तक्रारींसाठी सर्व २४ विभागांसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही सुरू केला आहे. यावर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन हे खड्डे ४८ तासांमध्ये भरण्यात येतील असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. या वर्षभरातच मुंबईत सुमारे एक हजार रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी तुंबते आणि अनेकवेळा रस्त्यांचा दर्जाही चांगला नसल्यास त्या ठिकाणी खड्डे पडतात. त्यास हा पावसाळाही अपवाद नसल्याने महापालिकेने खड्डे पडण्यापूर्वीच ते भरण्याची तयारी ठेवली आहे.या वेळेस भरपावसातही खड्ड्यात भरणे शक्य असलेल्या कोल्डमिक्सचा वापर करण्यात येणार आहे. या मिश्रणाचा प्रयोग यशस्वी ठरल्याने महापालिकेने या वर्षी वरळी येथील कारखान्यात कोल्डमिक्सचे उत्पादन सुरू केले आहे. यंदाच्या पावसाळ्यात अडीच हजार टन कोल्डमिक्स तयार करण्यात येणार आहे. आतापर्यंत ४० टन कोल्डमिक्स तयार करण्यात आले आहे. खड्ड्यांची तक्रार आल्यास कोल्डमिक्स तत्काळ त्यात भरले जाणार आहे.खड्ड्यांसाठी असे आहेत उपाय...प्रत्येक विभागामध्ये तक्रारीसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकतातडीच्या कामांसाठी प्रत्येक विभागामध्ये विशेष अभियंता आणि कर्मचाºयांचे पथकरस्त्याच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक - १८००२२१२९३प्रत्येक विभागात फलक लावून जनजागृतीप्रभागनिहाय तक्रारीसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकए वॉर्ड : ८८७९६५७६९८, बी - ८८७९६५७७२४, सी - ८८७९६५७७०४, डी - ८८७९६५७६९४, ई - ८८७९६५७७१२, एफ/एन - ८८७९६५७७१७, एफ/एस - ८८७९६५७६७८, जी/एन - ८८७९६५७६८३, जी/एस - ८८७९६५७६९३, एच/ई - ८८७९६५७६७१, एच/डब्ल्यू - ८८७९६५७६३३, के/ई - ८८७९६५७६५१, के/डब्ल्यू - ८८७९६५७६४९, पी/एस - ८८७९६५७६६१, पी/एन - ८८७९६५७६५४, आर/एस - ८८७९६५७६५६, आर/एन - ८८७९६५७६३६, आर/सी - ८८७९६५७६३४, एल - ८८७९६५७६२२/ ८८७९६५७६१०, एम/ई - ८८७९६५७६१२, एम/डब्ल्यू - ८८७९६५७६०८/ ८८७९६५७६१४, एन - ८८७९६५७६१७/ ८८७९६५७६१५, एस - ८८७९६५७६०३/ ८८७९६५७६०५, टी - ८८७९६५७६०९/ ८८७९६५७६११.

टॅग्स :मुंबई