...म्हणजे मुंबई आणि इंडस्ट्रीवर माझं प्रेम नाही असा अर्थ होतो का?; कंगनाचा 'रोखठोक' सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:39 PM2020-09-03T18:39:37+5:302020-09-03T18:40:01+5:30

बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं काही दिवसांपूर्वीच कंगनानं म्हटलं होतं.

If I feel unsafe,does that mean I hate the industry and Mumbai? say Kangana Ranaut  | ...म्हणजे मुंबई आणि इंडस्ट्रीवर माझं प्रेम नाही असा अर्थ होतो का?; कंगनाचा 'रोखठोक' सवाल

...म्हणजे मुंबई आणि इंडस्ट्रीवर माझं प्रेम नाही असा अर्थ होतो का?; कंगनाचा 'रोखठोक' सवाल

Next

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना राणौतनं सातत्यानं बॉलिवूड माफियांवर टीका केली. दिग्दर्शक करण जोहरसह घराणेशाही चालवणाऱ्या अनेकांवर टीका करताना कंगनानं अनेक गंभीर आरोपही केले. त्यात सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून तिनं मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र राज्य सरकारवरही आरोप केले. गुरुवारी तिनं मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर वाटत असल्याचं ट्विट केलं. त्यावरून नेटिझन्सनी तिला ट्रोल केलं. पण, कंगनानं गुरुवारी नेटिझन्सना 'रोखठोक' सवाल केला. 

कंगना राणौतचा रणबीर, रणवीर, विकीवर हल्लाबोल; म्हणाली, ड्रग्ज घेत नाही तर ब्लड टेस्ट करा...! 

संजय राऊतांनी शिवसेनेचं खरं रूप दाखवलं; कंगना Vs. सेना सामन्यात बबिता फोगाटची उडी

संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावादेखील तिनं केला आहे. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला.

मुंबईबाबतच्या या वक्तव्यानंतर ती ट्रोल झाली. एका टीकेला उत्तर देताना तिनं म्हटलं की,''एका महत्त्वाच्या अभिनेत्याची हत्या होते, मी त्यानंतर ड्रग्ज आणि मुव्ही माफिया रॅकेट बद्दल बोलली. सुशांत सिंग राजपूतच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुंबई पोलिसांवर माझा विश्वास नाही. ते माझी हत्या करतील, असे सुशांत सर्वांना सांगत होता. अखेर तसेच झाले. मला जर येथे असुरक्षित वाटत असेल, याचा अर्थ मुंबई आणि इंडस्ट्रीवर माझं प्रेम नाही असा अर्थ होतो का?'' 

कंगना Vs सेना वादात  बबिता फोगाटची उडी
तिनं ट्विट करून शिवसेनेवर टीका केली. तिनं लिहिलं की,''कंगना राणौत ही हिंदुस्तानची कन्या आहे, मुंबईत येण्यापासून तिला रोखण्याची कुणाची हिंम्मत नाही. संजय राऊतांनी असं बोलून शिवसेनेचा खरं रुप दाखवलं. बॉलिवूडमधील घाण साफ करण्याची गरज आहे.'' 

“आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही”
बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची भीती वाटते असं अभिनेत्री कंगना रणौतनं म्हटलं होतं. यावरुन आता माजी खासदार निलेश राणे यांनी तिला कडक शब्दात सुनावलं आहे. आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

नाइट रायडर्स संघातला 48 वर्षांचा तरुण; जाँटी ऱ्होड्स स्टाईल घेतली कॅच, पाहा व्हिडीओ

संजय राऊतांनी शिवसेनेचं खरं रूप दाखवलं; कंगना Vs. सेना सामन्यात बबिता फोगाटची उडी 

IPL 2020 : CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून सुरेश रैनाची हकालपट्टी; महेंद्रसिंग धोनीच्या हाती अंतिम निर्णय 

IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

IPL 2020 : सुरेश रैनाच्या माघारीनंतर उपकर्णधार कोण? CSKनं उत्तरातून दिले स्पष्ट संकेत

Web Title: If I feel unsafe,does that mean I hate the industry and Mumbai? say Kangana Ranaut 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.