२० जानेवारीपर्यंत ५० % उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार - उदय सामंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 01:18 PM2021-01-09T13:18:17+5:302021-01-09T13:18:48+5:30

Uday Samant : प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे या आणि इयर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. 

The idea of starting colleges with 50% attendance till January 20 - Uday Samant | २० जानेवारीपर्यंत ५० % उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार - उदय सामंत 

२० जानेवारीपर्यंत ५० % उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार - उदय सामंत 

Next
ठळक मुद्दे५० % उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठातील वसतिगृहे, स्थानिक परिस्थिती यांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे उदय सामंत म्हणाले.

मुंबई : येत्या २० जानेवारीपर्यंत ५० % विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील एरव्ही विद्यापीठातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीउदय सामंत यांनी आज जाहीर केले. प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे या आणि इयर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. 

५० % उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठातील वसतिगृहे, स्थानिक परिस्थिती यांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे उदय सामंत म्हणाले. प्राचार्य भरतीला दिलेल्या मान्यतेप्रमाणेच विद्यापीठातील इतर संवैधानिक रिक्त पदे व सहायक प्राध्यापक पदे भरण्याचा निर्णय लवकर घेण्यात येईल असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये उदय सामंत पुढील मुद्द्यांवर ही चर्चा केली
- आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय मुंबईत स्थापन करण्यासाठी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली 12 जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय. महाविद्यालयाशी निगडित सर्व समिती निर्णय घेणार
- तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या सर्व अभ्यासक्रमांना १५ जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ 
- विधी प्रवेशाना ही सोमवार मंगळवार या दिवशी आणखी 2 दिवसांची अंतिम मुदतवाढ
 - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जिल्हास्तरीय, परराज्यात व सीमा भागात  केंद्रे उभारण्याचा निर्णय. या दृष्टीने चर्चा व प्रयत्न सुरू .
- गोंडवाना विद्यापीठात अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्याला परवानगी 
- गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मॉडेल कॉलेज उभारण्याचा निर्णय

Web Title: The idea of starting colleges with 50% attendance till January 20 - Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.