EXCLUSIVE : कॉलेजला जाणारा घरातला पहिला मीच, मलिकांनी सांगितली बहिणीच्या डॉक्टरकीची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 11:13 AM2021-11-20T11:13:13+5:302021-11-20T12:07:54+5:30

EXCLUSIVE : सध्या चर्चेत असलेल्या नवाब मलिकांनी लोकमतच्या 'फेस टू फेस' कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील घटना उलगडून सांगितल्या. तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस कोणते, असा प्रश्न मलिक यांना विचारण्यात आला.

I was the first in the house to go to college, Nawab Malik told the story of her sister's education | EXCLUSIVE : कॉलेजला जाणारा घरातला पहिला मीच, मलिकांनी सांगितली बहिणीच्या डॉक्टरकीची गोष्ट

EXCLUSIVE : कॉलेजला जाणारा घरातला पहिला मीच, मलिकांनी सांगितली बहिणीच्या डॉक्टरकीची गोष्ट

Next
ठळक मुद्देमलिक यांनी कुटुंबातील शिक्षणाच्या वातावरणाबद्दलही मनमोकळेपणे गप्पा मारल्या. आमच्यात एक म्हण आहे, कम पढा खर्चे जाए और जादा पडा तो घर से जाए... असे आमचे वडिल म्हणत होते.

मुंबई - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मलिक यांनी मोहीमच उघडली आहे. सातत्यानं पत्रकार परिषदा घेत मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले. वानखेडेंनी चुकीच्या पद्धतीनं नोकरी मिळवली, बोगस कागदपत्रांचा आधार घेतला, असे आरोप मलिक यांनी केले. त्यामुळे, वानखेडे विरुद्ध मलिक असा वाद रंगला आहे. मात्र, लोकमतने वादापलिकडचे मलिक उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, आपल्या कुटुंबीयांबद्दलही मलिक यांनी भरभरुन सांगितलं. 

सध्या चर्चेत असलेल्या नवाब मलिकांनी लोकमतच्या 'फेस टू फेस' कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील घटना उलगडून सांगितल्या. तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस कोणते, असा प्रश्न मलिक यांना विचारण्यात आला. त्यावर गेले ४० दिवस आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते, असं मलिक यांनी सांगितलं. गेल्या ४० दिवसांच्या काळात मी करत असलेल्या कामातून मला सर्वाधिक आनंद मिळाल्याचे मलिक यांनी म्हटले. तर, जावयाला अटक झाली होती, तो काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट होता. कारण, मी हतबल झालो होतो, असेही त्यांनी सांगितले. 

मलिक यांनी कुटुंबातील शिक्षणाच्या वातावरणाबद्दलही मनमोकळेपणे गप्पा मारल्या. आमच्यात एक म्हण आहे, कम पढा खर्चे जाए और जादा पडा तो घर से जाए... असे आमचे वडिल म्हणत होते. त्यामुळे, घरात शिक्षणासाठी तेवढं अनुकूल वातावरण नव्हत. घरातून कॉलेज शिकणारा पहिला मीच होतो, त्यामुळे, कॉलेजला जाण्यासाठी मला स्कूटर होती, नंतर बुलेटही घेऊन दिल्याचे मलिक यांनी सांगितले. तसेच, त्यांच्या लहान बहिणीच्या शिक्षणाचा एक किस्साही त्यांनी सांगितला. 

बहिणीला शिक्षणाला पाठविण्यासाठी हट्ट

माझी बहिण 12 वी चांगल्या मार्काने पास झाली. त्यामुळे, तिला एमबीबीएसचं शिक्षण द्यायचं मी ठरवलं. त्यासाठी, बँगळुरू युनिव्हीर्सिटीच्या रमैय्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे बहिणीने गोल्ड मेडल घेतले, त्यानंतर सायन हॉस्पीटलमधून एमडीच शिक्षण पूर्ण केलं. मात्र, बहिणीला बंगळुरूला पाठविण्यासाठी कुटुंबातील सर्वांचाच विरोध होता. पण, मी हट्ट करुन बहिणीला तिकडे पाठवलं. आज ती आयुष्यात यशस्वी डॉक्टर आहे, त्यामुळे, शिक्षणाशिवाय काहीच नाही, असे मलिक यांनी म्हटले. दरम्यान, मलिक यांना 2 मुलं आणि 2 मुली आहेत. मोठा मुलगा एमबीए आहे, दुसरा वकील आहे, एक मुलगी फॅशन डिझायनर आहे. तर, सर्वात लहान मुलगी आर्कीटेक्ट असल्याचे मलिक यांनी सांगितले. 
 

Web Title: I was the first in the house to go to college, Nawab Malik told the story of her sister's education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.