वीज बिल माफ करा, असे बोललोच नाही, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 07:57 AM2022-11-29T07:57:19+5:302022-11-29T07:58:02+5:30

मनाची नाही तर जनाची लाज बाळगा, उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

I didn't say to waive the electricity bill: Fadnavis | वीज बिल माफ करा, असे बोललोच नाही, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

वीज बिल माफ करा, असे बोललोच नाही, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकऱ्यांच्या वीज बिलावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. वीज बिल माफ करा बोललोच नाही. वीज बिलाबाबत मध्य प्रदेश पॅटर्न राबवावा, अशी मागणी केली होती, पण तत्कालीन ठाकरे सरकारने एक रूपयाची ही सूट शेतकऱ्यांना दिली नाही.  त्यामुळे टीका करणाऱ्यांनी मनाची नाही तर जनाची ही लाज बाळगावी, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत बोलताना ते म्हणाले, कोरोना काळात मध्यप्रदेश सरकारने वीजबिल स्थगित आणि नंतर माफ केले होते तसेच महाराष्ट्रातही करावे. तोच पॅटर्न राबवावा, अशी मी मागणी केली होती. पण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एक रुपया सूट दिली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना वीजबिल प्रश्नावर बोलायचा अधिकारच नाही. महावितरणने पहिल्यांदाच असं पत्र काढलंय की फक्त सध्याचं चालू वीज बिल घ्यायचं. थकित बिलाची मागणी करायची नाही, त्यामुळे वीजबिलाच्या मुद्द्यावरून बोलणाऱ्यांनी जनाची आणि मनाची ही लाज बाळगावी.

सीमावाद : कोर्टावर विश्वास ठेवावा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद न्यायालयाच्या अखत्यारित आहे. त्यावर न्यायालय निर्णय देणार असल्याने वाद निर्माण करणे योग्य नाही. हे दोन्ही राज्यांसाठी योग्य नाही. न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे, असेही ते म्हणाले. 

राज काय बोलले, ते ऐकले नाही
nमहापुरुषांच्या अपमानाबाबत राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावर बोलताना फडणवीस यांनी आपण राज काय बोलले हे ऐकले नसल्याचे सांगितले. 
nज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा देश घडवण्यासाठी काम केले आहे त्यांच्याबद्दल कोणीही खालच्या स्तरावर बोलू नये. 
nशिवाजी महाराज महाराष्ट्राचं आणि भारताचं दैवत, आदर्श आहेत. त्यासंबंधी कोणताही वाद होऊ शकत नाही. त्यावरून राजकारण करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले. 

 

Web Title: I didn't say to waive the electricity bill: Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.