Join us  

‘मी मतदानासाठी सज्ज!’ नव मतदार घेणार शपथ : राष्ट्रीय मतदार दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:10 AM

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येत्या गुरुवारी, २५ जानेवारीला नवमतदारांना लोकशाही निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात येणार आहे. ‘मतदार असल्याचा अभिमान - मतदानासाठी सज्ज’ असे घोषवाक्य लिहिलेले बॅच वाटून तरुणांमध्ये निवडणूक आणि मतदानाप्रति जनजागृती करण्याचा मानस असल्याची माहिती मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

मुंबई : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येत्या गुरुवारी, २५ जानेवारीला नवमतदारांना लोकशाही निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात येणार आहे. ‘मतदार असल्याचा अभिमान - मतदानासाठी सज्ज’ असे घोषवाक्य लिहिलेले बॅच वाटून तरुणांमध्ये निवडणूक आणि मतदानाप्रति जनजागृती करण्याचा मानस असल्याची माहिती मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.मेहता म्हणाल्या, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५ जानेवारी रोजी शहरात विधानसभा मतदारसंघ स्तर व मतदान केंद्र स्तर अशा सर्व स्तरांवर विविध कार्यक्रम पार पडतील. त्यात जिल्हास्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन जय हिंद महाविद्यालयात केले आहे. या कार्यक्रमात निवडणूक प्रक्रियेत सामील झालेल्या दिव्यांग व्यक्तींना गौरवण्यात येणार आहे.याशिवाय प्रथमच नोंदणी झालेल्या तरुण व तरुणींना निवडणूक ओळखपत्र वाटप केले जाईल. दरम्यान, मुंबई मनपाच्या बहुतेक शाळांमधील विद्यार्थी, स्काऊट व गाईड, एनसीसी, एनएसएस अशा विविध उपक्रमांतील स्वयंसेवक व विद्यार्थीही प्रभातफेरी काढून मतदार नोंदणी आणि मतदानाबाबत जनजागृती करणार असल्याचेही मेहता यांनी सांगितले.या कार्यक्रमात राष्ट्रीय निवडणूक ज्ञान स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाईल. तसेच मतदार नोंदणी कार्यालय स्तरावर निबंध, रांगोळी, पथनाट्य अशा विविध करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केलेजाईल.१० महाविद्यालयांचे प्राचार्य हजर राहणारराष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जय हिंद महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात अधिकाधिक तरुणांनी सामील होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून मुंबईतील विविध १० महाविद्यालयांतील प्राचार्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्राचार्यांमार्फत हा कार्यक्रम महाविद्यालयांत पोहोचवण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे.

टॅग्स :निवडणूक