Join us  

कामाला निघालेल्या पत्नीला निरोप देऊन पतीची आत्महत्या , आत्महत्येमागचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 3:31 AM

नेहमीप्रमाणे कामाला निघालेल्या पत्नीला निरोप देत, ४५ वर्षीय पतीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ताडदेवमध्ये घडली.

मुंबई : नेहमीप्रमाणे कामाला निघालेल्या पत्नीला निरोप देत, ४५ वर्षीय पतीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ताडदेवमध्ये घडली. सतीश खैरनार (४५) असे मृत पतीचे नाव आहे. आत्महत्येमागचे गूढ कायम असून, या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत, अधिक तपास सुरू केला आहे.ताडदेवच्या जरीवाला इमारतीच्या तिसºया मजल्यावर खैरनार दुसरी पत्नी आणि तीन मुलांसोबत राहायचे. सध्या नोकरी नसल्याने ते घरीच होते. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते. त्यांची पत्नी जेवण बनविण्याचे काम करते. सकाळी सव्वानऊच्या सुमारास पत्नी नेहमीप्रमाणे कामावर निघाली. खैरनार यांनी तिला घराबाहेर सोडून निरोप दिला. दरवाजा अर्धवट उघडा ठेवत, त्यांनी पोटमाळ्यावर साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळाने त्यांचा मुलगा घरी आला, तेव्हा खैरनार गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. घटनास्थळी सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यांच्या आत्महत्येमागचे कारणही अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच, ताडदेव पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, ते अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :आत्महत्यामुंबई