Join us

अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीची हत्या

By admin | Updated: September 14, 2015 02:49 IST

अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीनेच पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी जोगेश्वरी येथे घडली. महम्मद युसूफ महमद रमजान अन्सारी

मुंबई : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीनेच पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी जोगेश्वरी येथे घडली. महम्मद युसूफ महमद रमजान अन्सारी (५८) असे पतीचे नाव असून, याप्रकरणी आरोपी पत्नी जन्नत अन्सारी (४५) हिला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे.येथील स्कॉटर्स कॉलनी रोड परिसरात राहणाऱ्या अन्सारी यांचा मासेविक्रीचा व्यवसाय होता. त्यांना तीन मुले आणि तीन मुली आहेत. सात वर्षांपूर्वी कर्करोगाच्या आजाराने त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. वर्षभरापूर्वी त्याच परिसरात मासेविक्री करणाऱ्या जन्नतसोबत त्यांनी दुसरा विवाह केला. जन्नतचाही विवाह झाला असून, तिने पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता. अन्सारीशी विवाह झाल्याच्या काही दिवसांनंतरच घराशेजारील महिलेशी त्याचे अनैतिक संबंध असल्याचे तिला समजले. यावरून अन्सारी आणि जन्नतमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. शनिवारी सकाळी तिने स्वयंपाकघरातील सुरीने अन्सारीच्या मानेवर, चेहऱ्यावर वार केले. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात अन्सारीने घराबाहेर धाव घेतली. शेजाऱ्यांनी त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वीच डॉक्टरांनी अन्सारी मृत झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मेघवाडी पोलिसांनी जन्नतला ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सुरूअसल्याचे मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद शिंदे यांनी सांगितले.