Join us

मानवी हस्तक्षेपाचा फटका

By admin | Updated: January 7, 2015 02:08 IST

सूर इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये ‘क्लायमेट चेंज आणि सोसायटी : पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर’ या विषयावर मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात संशोधकांनी काढला.

मुंबई : जागतिक हवामान बदल नैसर्गिकरीत्या घडत आहेत. यामध्ये मानवनिर्मित साधने आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे भर पडत असल्याचा सूर इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये ‘क्लायमेट चेंज आणि सोसायटी : पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर’ या विषयावर मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात संशोधकांनी काढला.देशातल्या नद्यांचे खोरे मोठे आणि पात्र अरुंद झाली आहेत. त्या विस्तीर्ण खोऱ्यात मानवी वस्ती वाढत चालली असून, केदारनाथच्या सभोवती वस्ती वाढल्याने मंदाकिनी नदीच्या पात्राला मोकळा मार्ग न मिळाल्याने केदारनाथचा प्रलय घडला. देशातल्या सर्व नद्यांच्या बाबतीत हाच प्रकार घडला आहे. शहरीकरणामुळे पाण्याचा अतिवापर आणि सौंदर्यीकरणासाठी नैसर्गिक स्रोत बुजवणे, जंगले छाटणे आदी प्रकारांमुळे आपण नैसर्गिक प्रलय ओढवून घेत आहोत, असे प्रतिपादन लखनौ विद्यापीठाचे भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक ध्रुवसेन सिंग यांनी केले. राज्यासह सीमांध्र, पश्चिम बंगाल आणि गंगोत्रीमध्ये मान्सूनचे प्रमाण वाढत आहे. यासाठी सरकारने दूरगामी धोरणे आखायला हवीत, असाही सूर परिसंवादात निघाला.या वेळी नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिक अँड ओशियन रिसर्च, गोवाचे संचालक एस. राजन यांनी सादरीकरण केले. (प्रतिनिधी)अजून तयारी नाहीउत्तराखंडसारख्या ढगफुटीच्या घटना घडल्या तर त्यांना सामोरे जाण्यास कोणतीही तयारी नसते, असे दिल्लीच्या नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरीच्या रेडिओ अँड टिमॉस्फरिक सायन्स डिव्हिजनचे राजेश अग्निहोत्री यांनी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिले.ही तर थाळी आयआयटीचे यश त्यांच्या शिक्षणपद्धतीत आहे. आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना गोष्ट सोडवण्यास सांगितली तर ते करतात. पण, नवीन करण्यास त्यांना जमत नाही. आपली शिक्षण पद्धती ही थाळी जेवणासारखी आहे. प्रत्यक्षात बुफेप्रमाणे शिक्षण घेता आले पाहिजे, असे मत संजय धांडे यांनी मांडले.