Join us  

साक्षीदारांचे संरक्षण कसे करणार? सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 2:00 AM

सोहराबुद्दिन शेख बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात ३१ महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाल्याची गांभीर्याने दखल घेत, उच्च न्यायालयाने या खटल्यातील सर्व साक्षीदार निडरपणे त्यांची साक्ष न्यायालयात नोंदवतील, यासाठी काय करणार आहात? अशी विचारणा सीबीआयकडे सोमवारी केली.

मुंबई : सोहराबुद्दिन शेख बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात ३१ महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाल्याची गांभीर्याने दखल घेत, उच्च न्यायालयाने या खटल्यातील सर्व साक्षीदार निडरपणे त्यांची साक्ष न्यायालयात नोंदवतील, यासाठी काय करणार आहात? अशी विचारणा सीबीआयकडे सोमवारी केली.आत्तापर्यंत या खटल्यातील ३१ साक्षीदारांनी साक्ष फिरवल्याने विशेष न्यायालयाने त्यांना ‘फितूर’ म्हणून जाहीर केले आहे. सीबीआय याबाबत केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, असे न्या. रेवती डेरे-मोहिते यांनी म्हटले. अनेक साक्षीदार साक्ष फिरवत आहेत, हे लक्षात घेऊन तुम्ही (सीबीआय) त्यांना (साक्षीदारांना) संरक्षण देत आहात का? दोषारोपपत्र दाखल करून तुमचे कर्तव्य संपत नाही. तुमच्या साक्षीदारांना संरक्षण देण्याचे काम तुमचेच आहे,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सीबीआयवर ताशेरे ओढले.सोहराबुद्दिन व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने १५ जणांची आरोपमुक्तता केली. त्यात एन. के. आमीन ब पोलीस हवालदार दलपतसिंह राठोड यांचाही समावेश आहे. सीबीआयने त्यांच्या आरोपमुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर सुनावणी करताना न्यायालयाने सीबीआयलाच सुनावले.सोहराबुद्दिन शेख, त्याची पत्नी कौसर बी व तुलसीराम प्रजावती यांची हत्या करण्याचा आरोप आमीन यांच्यावर सीबीआयने ठेवला आहे. आमीन यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी सीबीआयने नथुबा जडेजा याने नोंदविलेल्या साक्षीचा आधार उच्च न्यायालयात घेतला.‘२००५मध्ये गुजरात एटीएसपुढे जबाब नोंदविल्यानंतर जडेजाने त्यात अनेकवेळा सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्याने साक्ष फिरवली. मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच त्याची साक्ष नोंदविली. मात्र, त्याने साक्ष फिरवली. त्यामुळे त्याला ‘फितूर’ म्हणून जाहीर केले.अशी साक्ष फिरवणाºयांवर काही कारवाई केलीत का? अशी विचारणा न्यायालयाने केल्यावर सीबीआयतर्फे ज्येष्ठ वकील अ‍ॅड. अनिल सिंग यांनी याबाबत माहिती मिळवण्यासाठी वेळ मागितली. सीबीआय बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. ज्या प्रकारे सीबीआयकडून मदत मिळायला हवी होती, तशी मदत मिळत नाहीये. जर हे असेच सुरू असेल, तर खटला कशाला चालवता?’ असे न्यायालयाने संतप्त होत म्हटले. मंगळवारीही या अपिलावर सुनावणी होणार आहे.४४ साक्षीदारांपैकी आत्तापर्यंत ३१ साक्षीदार फितूर- सोहराबुद्दिन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालयात सीबीआयच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी२७ नोव्हेंबरपासून ४४ साक्षीदार ‘साक्षीदारांच्या पिंजºयात’ उभे राहिले. मात्र, आत्तापर्यंत३१ साक्षीदार फितूर झाले.- विशेष न्यायालयाने साक्ष देण्यासाठी तीन पंच साक्षीदारांना समन्स बजावले होते. त्यानुसार हे तिन्ही साक्षीदार सोमवारी विशेष न्यायालयात उपस्थित राहिले. त्यातील एका पंचाने सरकारी वकिलांच्या दाव्याचे समर्थन केलेही. मात्र, गुजरातच्या एटीएस मुख्यालयात त्याच्याबरोबर असलेल्या पोलीस हवालदार व त्याला रक्ताच्या सहा बाटल्या दाखवणाºया पोलीस उपअधीक्षकांचे नाव आठवत नसल्याने त्याला ‘फितूर’ जाहीर करण्यात आले. मंगळवारी आणखी दोन पंच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे.

टॅग्स :न्यायालय