Join us  

बदलते ऋतुचक्र धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 7:31 AM

मुंबईत ऐन दिवाळीत पाऊस पडतोय, हिवाळ्याचा मागमूसही नाही. दिवसा उन्हाच्या झळा आणि संध्याकाळी पावसाच्या सरी असा काहीसा प्रकार सुरू आहे.

- अक्षय चोरगेमुंबई : मुंबईत ऐन दिवाळीत पाऊस पडतोय, हिवाळ्याचा मागमूसही नाही. दिवसा उन्हाच्या झळा आणि संध्याकाळी पावसाच्या सरी असा काहीसा प्रकार सुरू आहे. एकंदरीत ऋतुचक्र बदलू लागले आहे. अशा वातावरणात फटाके वाजवून प्रदूषणात अधिक भर घालण्याऐवजी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करायला हवी, अशी भावना पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. मुंबईकरांनी जबाबदारीची जाण ठेवत सण-उत्सव साजरे करायला हवेत. पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यावर भर द्यायला हवा, अशी भूमिका पर्यावरणप्रेमी मांडत आहेत.फटाके वाजविणे पूर्णपणे बंद करायला हवे, परंतु हा बदल सहज शक्य नाही. त्यामुळे मोठ्या आवाजाचे, अधिक वायुप्रदूषण करणारे फटाके वाजविणे बंद करून त्याची सुरुवात करायला हवी. टप्प्याटप्प्याने मुंबईत पूर्णपणे फटाके वाजविणे बंद होईल, या दृष्टीने जागृती झाल्यास शासनाला अथवा न्यायालयाला कोणत्याही नियमांची आवश्यकता भासणार नसल्याचे मत पर्यावरणाबाबत काम करणाºया कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांनी खेळाला प्राधान्य देत, सुट्टी साजरी करायला हवी. दिवाळी अंक आणि इतर साहित्यांचे वाचन करायला हवे.शाळा, ट्युशन आणि अभ्यासाच्या ओझ्याखाली विद्यार्थ्यांना एरव्ही खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शिवाय, मोबाइलवर वेळ घालविण्याचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. या गोष्टी टाळून दिवाळीची २० ते २२ दिवसांची सुट्टी मैदानी खेळासाठी वापरावीत, असेही पर्यावरणप्रेमींनी सांगितले.प्रदूषण न करणारे फटाके वाजवाध्वनी अणि वायुप्रदूषण न करणारे, कमी करणारे फटाके बाजारात उललब्ध आहेत, परंतु अशा फटाक्यांच्या किमती जास्त असतात, शिवाय निवडक ठिकाणीच त्यांची विक्री होते. शेजारच्या आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर असे फटाके उपलब्ध आहेत. महाराष्टÑातही असे फटाके सहज उपलब्ध होतील, अशी व्यवस्था करायला हवी.फटाक्यांमुळे फक्त प्रदूषणच होते असे नाही, तर मानवी आरोग्यावरही त्यांचा विपरित परिणाम होतो. रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे मोठ्या आवाजाचे, तसेच मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण करणारे फटाके फोडू नयेत. कमी प्रदूषण करणारे फटाके वाजविण्यास हरकत नाही, परंतु फटाके पूर्णपणे बंद झाले तर उत्तमच. त्याचबरोबत प्रदूषण शोषून घेण्यासाठी शहरातील वृक्षांची संख्या वाढविण्याचे कर्तव्यदेखील बजावले पाहिजे. दिवाळीला फटाके वाजविण्यापेक्षा नातेवाईक, शेजारी यांच्या घरी जाऊन फराळ करावा. शाळकरी मुलांनी दिवाळी अंक अथवा इतर वाचन करावे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी. फटाके वाजवून सर्वजण स्वत:चे नुकसान करत आहेत.- डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्तीसण उत्साहात साजरे करावे. परंतु फटाके फोडून दिवाळी साजरी करावी, असे कोणत्या शास्त्रात लिहिले आहे. फटाक्यांमुळे, लोकांना श्वसनाचे विकार होतात. रुग्णालयांजवळ जर फटाके फोडले, तर रुग्णांवर त्याचे गंभीर परिणाम होतात. प्रदूषणामुळे ऋतुचक्र बदलू लागले आहे. दिवाळीत पाऊस पडतोय. मुंबईकरांनी आता सावध होण्याची वेळ आली आहे. फटाके वाजविणे पूर्णपणे बंद करावे. शक्य नसल्यास कमी प्रदूषण करणारे, कमी आवाज करणारे फटाके वाजवावे. हळूहळू बदल घडेल. प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईकर ‘डेंजर झोन’मध्ये आहेत, त्यामुळे मुंबईकरांनी वेळीच सजग होणे आवश्यक आहे.- संजय शिंगे, पर्यावरणप्रेमीमोठ्या आवाजाचे, वायुप्रदूषण करणारे फटाके वाजविण्यापूर्वी मुंबईतील दमा, अस्थमा आणि अति रक्तदाबाच्या रुग्णांचा विचार करणे आवश्यक आहे. फटाक्यांचा वायू आणि ध्वनिप्रदूषणाचे मुक्या प्राण्यांवर गंभीर परिणाम होतात. पक्षी आवाजाने घाबरून जातात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचा विचार करून फटाके वाजवावेत. त्याचबरोबर, मुंबईसह जगभरातील बदलणारे ऋतुचक्र ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे, त्यामुळे वेळीच मुंबईकरांनी जागे होणे आवश्यक आहे. दररोज अधिकाधिक प्रदूषण करून, आपण तापमान वाढीला आमंत्रण देत आहोत. दिवाळी पारंपरिक पद्धतीने साजरी करावी. काळानुसार आता आपण बदलणे आवश्यक आहे.- गॉडफ्रे पिमेंटा, पर्यावरणप्रेमीदिवाळी ही पारंपरिक पद्धतीनेच साजरी व्हायला हवी. पूर्वीच्या काळात फटाके वाजविले जात नव्हते. सण-उत्सव साजरे करत असताना आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन बिघडत नाही, याची काळजी घ्यायला हवी. फक्त दिवाळीचे दोन-तीन दिवस फटाके वाजविणे थांबविण्यापेक्षा वर्षभरात विविध कारणास्तव वाजविले जाणारे फटाके थांबवणे गरजेचे आहे. ऋतुचक्र बदलत आहे, तापमान वाढ होत आहे. हे थांबविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रदूषण थांबवायला हवे. वाहने आणि सिगारेटवरही बंधने लादणे आवश्यक आहे.- परवीश पांड्या, पर्यावरणप्रेमीबदलणाºया ऋतुचक्रास फक्त दिवाळीत वाजविले जाणारे फटाकेच जबाबदर नाहीत. लग्न, समारंभ, निवडणुका या काळातही फटाके वाजविले जातात, त्यावर बंधने घालावी. वाहने, सिगारेटमुळेही मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ºहास होत आहे. तेदेखील थंबविणे गरजेचे आहे. फक्त दिवाळीत फटाके वाजवू नका, असे म्हणालो, तर लोकांच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे प्रदूषण करणाºया विविध घटकांवर बंधन आणणे आवश्यक आहेत. अवकाळी पाऊस पडू लागला आहे. मुंबईतील हिवाळा हा ऋतू नाहिसा होत आहे, त्यामुळे आता जागे व्हावे लागेल. प्रदूषण थांबविण्यासाठी शासनासोबत नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे.- सुनील कुमरे, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :मुंबई