Join us  

प्रभादेवीत महापालिकेच्या जागेवर होणार रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 1:48 AM

प्रभादेवी येथील गोखले रोडवरील जाखादेखी मंदिराजवळील महापालिकेच्या आरक्षित जागेवर लवकरच बहुउद्देशीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

मुंबई : प्रभादेवी येथील गोखले रोडवरील जाखादेखी मंदिराजवळील महापालिकेच्या आरक्षित जागेवर लवकरच बहुउद्देशीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे. श्री सिद्धिविनायक न्यासच्या माध्यमातून हे रुग्णालय चालविण्यात येणार असून गरीब रुग्णांना कमी दरात उपचार मिळणार आहेत. यासाठी पालिका सिद्धिविनायक न्यासला आठ मजली इमारत बांधून देणार आहे. या रुग्णालयासाठी जमीन हस्तांतरणाचा करार मंगळवारी महापालिकेत झाला.गोखले रोडवरील जाखादेवी मंदिरालगतचा एफपी/९८३, टीपीएस-४ हा भूखंड भाडेपट्टीने देण्याबाबतचा सामंजस्य करार सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या दालनात पालिका प्रशासन आणि श्री सिद्धिविनायक न्यास यांच्यादरम्यान झाला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, श्री सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर,मुख्य कार्यकारी अधिकारीप्रियंका छापवाले, नगरसेविका राजुल पटेल, पालिकेच्या आरोग्यअधिकारी डॉ. पद्मजा केसकर उपस्थित होते.रुग्णालयाची इमारत तळ मजला अधिक आठ मजल्यांची असणार आहे. इमारतीमधील तीन ते आठ मजले श्री सिद्धिविनायक न्यासला पालिका हस्तांतरीत करणार आहे. तळमजल्यावर पार्किंगची सुविधा आणि पहिल्या मजल्यावर सर्वसामान्य रुग्णांसाठी दवाखाना सुरुकरण्यात येणार आहे. यारुग्णालयात कार्डियाक, सर्जिकल, माता-बाल तज्ज्ञ, डोळ्यांवरील उपचार आदी आजारांवर उपचार करण्यासाठी विभाग सुरू करण्यात येणार आहेत.गरीब रुग्णांना दिलासा...या रुग्णालयात प्रभादेवी परिसरासह राज्यभरातील गरीब रुग्णांना माफक दरात उपचार मिळणार आहे.>आदिवासी मुलांना ‘पौष्टिक’ लाडूश्री सिद्धिविनायक न्यासच्या माध्यमातून आदिवासी भागातील मुलांना पौष्टिक लाडू देण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी यावेळी दिली. जोगेश्वरीसारख्या भागात हा उपक्रम सुरू आहे. येथील मुलांना पोषक आहार मिळावा यासाठी पालघर-मोखाडासारख्या उपक्रम राबविला़