Join us  

सहायक आयुक्तांना धमकी देणारा गुंड गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 3:50 AM

महापालिकेचे बी विभागाचे सहायक आयुक्त व त्यांचे सहकारी हे युसूफ मेहेर अली मार्गावर ताडपत्री, जाळ्या इत्यादी विकणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करताना

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेचे बी विभागाचे सहायक आयुक्त व त्यांचे सहकारी हे युसूफ मेहेर अली मार्गावर ताडपत्री, जाळ्या इत्यादी विकणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करताना स्थानिक गुंडाने शिवीगाळ करत सहायक आयुक्त उदयकुमार शिरूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिरूरकर यांनी कारवाई पूर्ण करत पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये गुंडाविरुद्ध गुन्हा नोंदविला असता त्या गुंडास अटक करण्यात आली आहे.शिरूरकर हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत मशीद स्थानकाजवळील युसूफ मेहेर अली मार्गावर पाहणी करत असताना काही दुकानदारांनी ४ ते ५ फूट त्यांच्या दुकानाबाहेर बेकायदेशीररीत्या ताडपत्री, फ्लोरिंग लमिनेत, जाळ्या इत्यादी विक्रीकरिता ठेवले होते. तसेच या मार्गावर वाहतूककोंडी होत असल्याबाबत स्थानिक व इतर सामाजिक मंडळांकडून तक्रारी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणी महापालिकेने स्थानिक दुकानदारांना विक्रीचा माल हटविण्याबाबत निर्देश दिले. परंतु, दुकानदार सहायक आयुक्तांच्या निर्देशांचेपालन करण्यास कुचराई करत असल्याने सहायक आयुक्तांनी स्वत: रस्त्यावर उतरून माल हटविण्यास सुरुवात केली.दरम्यान, स्थानिक दुकानदारांपैकी एका स्थानिक गुंडाने पुढे येत कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला. शिवाय पालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत अंगावर धावून आला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तथापि, शिरूरकर यांनी त्याच्या धमक्यांना भीक न घालता, स्थानिक दुकानदारांना पुन्हा सूचना देऊन सगळा माल त्वरित हटविण्यास सांगितले. तसे न केल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले.