Join us  

स्वप्ननगरीत मिळणार बेघरांना निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:29 AM

शेफाली परब-पंडित ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वप्ननगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत दररोज शेकडो लोक स्वप्ने घेऊन येतात. ...

शेफाली परब-पंडित ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वप्ननगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत दररोज शेकडो लोक स्वप्ने घेऊन येतात. डोक्यावर छप्पर मिळावे यासाठी झटतात. पण मुंबई नगरीतल्या स्पर्धेत प्रत्येकाला छत मिळतेच असे नाही. अशांपैकी रोजंदारीवर काम करणारे अनेक जण रस्त्यांवरच आपले बस्तान मांडतात. थंडी-वाऱ्यात, मुसळधार पावसात या लोकांना संरक्षण मिळावे, यासाठी महापालिकेमार्फत निवारे बांधण्यात येतात. असे २५ ‘रात्र निवारे’ बांधण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. संगणक लॅब, जलतरण तलाव आणि उद्यान असे सुसज्ज निवारे बेघरांना उपलब्ध होणार आहेत. 

रात्र निवाºयासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार एक लाख लोकांमागे एक रात्र निवारा असणे बांधकारक आहे. त्यानुसार मुंबईत १२५ निवारे बांधणे अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ २३ निवारे उपलब्ध आहेत. यापैकी बहुतांशी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्याने अन्य बेघरांची गैरसोय होत असते. त्यामुळे रात्र निवाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी वारंवार केली जाते.त्यानुसार २५ रात्र निवारे सुरू करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. यासाठी विकास आराखडा २०३४ मध्ये बेघरांसाठी निवारा व मनोरंजन केंद्रांकरिता तीन अ‍ॅमेनिटी प्लॉट उपलब्ध केले आहेत.

माटुंगा, चर्चगेट, कामाठीपुरा, खेतवाडी, वांद्रे, अंधेरी, बोरीवली आणि मालाड येथे हे रात्र निवारे आहेत. या निवाºयांमध्ये मिळणाºया अपुºया सुविधांबाबत अनेकवेळा तक्रार येत असते. २०११ मध्ये केलेल्या गणनेनुसार मुंबईत ५७ हजार ४६१ बेघर आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये ही संख्या वाढून दोन लाखांच्या घरात पोहोचली असेल. मात्र मुंबईत जागेची टंचाई असल्याने रात्र निवाºयांसाठी जागा मिळत नसल्याची खंत पालिका अधिकाºयाने व्यक्त केली.

दोन कोटींची तरतूद!या निवारा केंद्रांसाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षांत दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निवाºयांमध्ये संगणक लॅब, तरण तलाव, उद्यान अशा मनोरंजनात्मक सोयी-सुविधा असतील, असे अर्थसंकल्पातून स्पष्ट करण्यात आले आहे. २०११ मध्ये केलेल्या गणनेनुसार मुंबईत ५७,४६१ बेघर आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये ही संख्या वाढून दोन लाखांच्या घरात पोहोचली असेल. २०२१ मध्ये पुन्हा गणना होणार आहे. त्या वेळेस ही गणना केवळ एका रात्रीत न आटोपता तीन-चार दिवस केली जावी, जेणेकरून बेघरांचा अचूक आकडा मिळेल, असे मत व्यक्त होत आहे.