तळीरामांचं भागलं... दिवसभरात राज्यातील 8,268  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 09:39 PM2020-05-16T21:39:08+5:302020-05-16T21:39:58+5:30

एकूण 10,791  किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी  4,866 अनुज्ञप्ती सुरू

Home-grown liquor was sold to 8,268 customers in the state during the day MMG | तळीरामांचं भागलं... दिवसभरात राज्यातील 8,268  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

तळीरामांचं भागलं... दिवसभरात राज्यातील 8,268  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती*

मुंबई : गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून आजपासून सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली. आज दिवसभरात राज्यातील 8,268 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्य सेवन परवाने ऑफलाईन पद्धतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर सेवन परवाने एका वर्षाकरिता १०० रुपये किंवा आजीवन परवान्याकरिता १००० रुपये एवढे शुल्क अदा करून मिळवू शकतात. 

राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 139 अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश 11 मे 2020 रोजी निर्गमित केला आहे.या आदेशाबाबत क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांना याबाबत करावयाच्या कारावाईबाबत आदेश देण्यात आले आहेत. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी  करण्यात येत आहे. 

राज्यात 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि.15 मे, 2020 रोजी राज्यात 119 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 63 आरोपींना अटक करण्यात आली असून  24 लाख 16 हजार  रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 24 मार्च, 2020 पासुन दि.15 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5,608  गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,520 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर 565 वाहने जप्त करण्यात आली असून रु.15 कोटी 17 हजार किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक -  १८००८३३३३३३  व्हाट्सअँप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  हा ई-मेल - commstateexcise@gmail.com आहे.

Web Title: Home-grown liquor was sold to 8,268 customers in the state during the day MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.