Join us  

जलवाहिनीला तडाखा

By admin | Published: April 21, 2015 5:45 AM

नियोजनाअभावी मुंबईतील आणखी एका खोदकामाचा फटका पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला बसला आहे़ दहिसर नदीवरील जुन्या संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे

मुंबई : नियोजनाअभावी मुंबईतील आणखी एका खोदकामाचा फटका पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला बसला आहे़ दहिसर नदीवरील जुन्या संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली़ यामुळे लाखो लीटर पाणी वाया जाऊन स्थानिक नागरिकांचे हाल झाले़ मात्र या प्रकरणात संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यास पालिका प्रशासनाकडून चालढकल सुरू आहे़दहिसर येथील रंगनाथ केसकर रस्त्याला लागून दहिसर पुलापासून रुस्तमजी संकुलापर्यंत दहिसर नदीच्या जीर्ण दगडी संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू आहे़ यासाठी १९ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे़ हे काम सुरू असताना नजीकच्या १८ मि़मी़ व्यासाच्या जलवाहिनीला तडा गेला़ दोन दिवसांपूर्वीच्या या घटनेत लाखो लीटर पाणी वाहून गेले़ या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे़ परंतु स्थानिकांना मात्र दोन दिवस पाण्यासाठी हाल काढावे लागले़ विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी आज या परिसराची पाहणी केली़ त्यांच्याबरोबर संबंधित अधिकारी होते़ परंतु ठेकेदारावर कारवाई करण्याची जबाबदारी अधिकारी एकमेकांवर ढकलत असल्याची नाराजी आंबेरकर यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)