Join us  

हिमालय पुलावर सरकते जिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 5:53 AM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे गेले नऊ महिने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे गेले नऊ महिने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी पूल बांधण्याची गरज आहे का? यावरही विचार सुरू होता. अखेर या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाला सरकते जिने असणार आहेत.१४ मार्च रोजी हा पूल कोसळून या दुर्घटनेत सात पादचारी मृत्युमुखी पडले होते. या दुर्घटनेनंतर हा पूल पूर्णत: पाडण्यात आला. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावर जाणाºया लाखो प्रवाशांना रस्ता ओलांडून अथवा भुयारी मार्गाने जावे लागत होते.नवीन पूल बांधताना तेथे सिमेंट काँक्रिट पद्धतीचा जिना बनविण्यासाठी खोदकाम करावे लागणार आहे. या खोदकामामुळे जवळच्या टाइम्स आॅफ इंडिया व अंजुमन-ए-इस्लाम या पुरातन इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुरातन वास्तू समितीकडून या पुलाच्या बांधकामाला परवानगी नाकारली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येथे सरकता जिना बांधण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे.