Join us  

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 4:50 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर सोमवारी सेवानिवृत्त झाल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुजाता मनोहर यांच्यानंतर मंजुळा चेल्लूर या मुंबई उच्च न्यायालयाच्या

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर सोमवारी सेवानिवृत्त झाल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुजाता मनोहर यांच्यानंतर मंजुळा चेल्लूर या मुंबई उच्च न्यायालयाच्या दुस-या महिला न्यायाधीश बनल्या. सोमवारी त्यांनी त्यांच्या कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या सर्व वकिलांचे व पक्षकारांचे आभार मानले. ‘माझा हा चांगला काळ होता. प्रत्येकाकडून मी काही ना काही शिकले, मग तो ज्येष्ठ किंवा कनिष्ठ वकील का असेना. मी प्रत्येकाचे आभार मानते,’ असे न्या. चेल्लूर म्हणाल्या.कामाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी दोन महत्त्वाचे निकाल दिले. पहिला म्हणजे एनएससीएलमध्ये एफटीआयएलचे एकत्रीकरण करण्यास सरकारला हिरवा कंदील दाखवला. तर दुसरीकडे मेट्रोने प्रवास करणाºया लाखो प्रवाशांना दिलासा दिला. मेट्रोचे भाडे वाढवण्याचा एमएमओपीएलला नकार दिला.५ डिसेंबर १९५५ रोजी जन्मलेल्या चेल्लूर या मूळच्या कर्नाटकमधील आहेत. त्या तेथील पहिल्या महिला वकील व त्यानंतर पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून सेवेत रुजू होण्यापूर्वी त्या केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून कामकाज पाहत होत्या. आॅगस्ट २०१६ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली.१६ महिन्यांच्या मुख्य न्यायाधीशपदाच्या कारकिर्दीत मेट्रोला विरोध करणाºया अनेक याचिका त्यांच्यापुढे आल्या. त्यांनी प्रत्येक वेळी शासन आणि नागरिकांचे हित यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना शांत झोप मिळावी यासाठी त्यांनी मेट्रो- ३ प्रकल्पाचे काम रात्रीच्या वेळी बंद करण्याचा आदेश एमएमआरसीएलला दिला. तर दुसरीकडे बलात्कार व अ‍ॅसिड हल्ला पीडितांना सरकारकडून आर्थिक साहाय्य म्हणून देण्यात येणाºया तुटपुंज्या नुकसानभरपाईच्या रकमेत त्यांनी वाढ करून घेतली. त्यांनी तसा आदेश सरकारला दिला. सरकारने ही रक्कम तीन लाखांहून १० लाख रुपये इतकी वाढवली आहे.पक्षकारांना जलदगतीने न्याय मिळावा, यासाठी गेल्याच महिन्यात चेल्लूर यांनी प्रत्येक विषयाप्रमाणे याचिकांचे वर्गीकरण करत त्यांच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठे नेमली. त्यामुळे नागरिकांना न्याय जलदगतीने मिळण्यास मदत होणार आहे.जोपर्यंत नव्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येत नाही, तोपर्यंत न्या. विजया ताहिलरमाणी हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कारभार सांभाळतील.

टॅग्स :न्यायालय