Join us

हॅलो पान १...महात्मा गांधीची स्वाक्षरी लिलावात

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST

(हॅलो पान १ साठी...)

(हॅलो पान १ साठी...)
(फोटो मेलवर आहेत.)
...........................................

महात्मा गांधीची स्वाक्षरी लिलावात

मुंबई: तोडीवाला लिलावगृहाने त्यांचा ९१ वा लिलाव आयोजित केला आहे. या लिलावात पुरातन काळातील पदके, नाणी, चलनी नोटा यांचा समावेश असून १४ डिसेंबर रोजी रॉयल ओक बॅँक्वेट्स, जहांगीर कला दालनाजवळ पार पडणार आहे. या लिलावात १९३१ साली एका पारशी पत्रकाराने महात्मा गांधीजींची मुलाखत घेतली होती. त्यावेळी घेतलेली त्यांची स्वाक्षरी ही या लिलावाचे वैशिष्ट्य आहे.
तसेच सम्राट अकबर, जहांगीर आणि शहाजहांन यांच्या काळातील अनेक चांदी आणि सोन्याची नाणी या लिलावात समाविष्ट करण्यात आली आहेत. ही नाणी ६ ते १० लाखांत विकली जाण्याची शक्यता लिलावगृहातून व्यक्त केली जात आहे. ही नाणी दिल्ली आणि आग्रा या ठिकाणांहून दक्षिण सुरत आणि हैद्राबाद अशा विविध भागांतील टाकसाळीत तयार करण्यात आली होती.
या लिलावात ५०० विविध नाणी, बॅँकांच्या चलनी नोटा आणि पदकं, भारतीय नाणे परंपरेतील नाणी, हाताने पाडलेली नाणी यांचा समावेश आहे. तसेच २४०० वर्षांपूर्वींची चांदीची नाणी ३ हजार रुपयांना तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील १६०० वर्ष जुनं सोन्याचे नाणे अंदाजे ५० हजारांना विकलं जाण्याची शक्यता तोडीवाला लिलाव मंडळाकडून वर्तवण्यात आली आहे.
मुघलांनंतर अवध, आसाम, बडोदा, बिकानेर, जयपूर, इंदौर संस्थांच्या अधिपत्याखाली तयार करण्यात आलेल्या नाण्यांचादेखिल समावेश करण्यात आला आहे. अनेक भारतीय धुरिणांना व्हिक्टोरिया राणीने दिलेली पदकं, पंचम जॉर्जची प्रतिमा असलेली १९१७ सालची एक रुपयाची नोट अशा चलनी नोटाही या लिलावात असणार आहेत. (प्रतिनिधी)
.............................................