Join us

कोकणात जोरदार पाऊस

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

उर्वरित राज्याला पावसाची प्रतिक्षा

उर्वरित राज्याला पावसाची प्रतिक्षा

पुणे : कोकणात मॉन्सून सक्रीय झाल्याने गेल्या २४ तासात या भागात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मात्र राज्याच्या उर्वरित भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. कणकवली येथे सर्वाधिक ९० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचे प्रमाण घटले आहे. मॉन्सूनला बरसण्यासाठी अनुकुल स्थितीच निर्माण होत नसल्याने पाऊस गायब झाल्याचे चित्र आहे. मात्र गेल्या २ दिवसांपासून कोकणात पुन्हा पावसास सुरूवात झाली आहे. गेल्या २४ तासात सावंतवाडी येथे ८०, कुडाळमध्ये ७०, देवगड, मोहाडीफाटा येथे ४०, महाड, गडचिरोली, एटापल्ली येथे ३०, वेंगुर्ला, चंदगड, गगनबावडा, गारगोटी, मौदा येथे २०, अंबरनाथ, भिवंडी, कर्जत, पोलादपूर, राजापूर, ठाणे, आजरा, गडहिंग्लज, जळगाव, कागल, राधानगरी, भिवापूर, चार्मोशी, रामटेक येथे १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
पुढील ४८ तासात कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.