Join us  

मुंबईला महिनाभर बसणार उष्म्याचा तडाखा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 5:40 AM

पावसाची विश्रांती, धुरके आणि पूर्वेकडून वाहणारे वारे या तीन प्रमुख घटकांमुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या आर्द्रतेत तब्बल २० टक्के आणि कमाल तापमानात ५ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे.

मुंबई : पावसाची विश्रांती, धुरके आणि पूर्वेकडून वाहणारे वारे या तीन प्रमुख घटकांमुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या आर्द्रतेत तब्बल २० टक्के आणि कमाल तापमानात ५ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचे चटके व दमट हवामानामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत. या ‘सप्टेंबर हीट’मध्ये उत्तरोत्तर भरच पडणार असल्याने मुंबईसाठी हा पावसाळ्यातील महिना कडक उन्हाळ्याचा ठरणार आहे. मुंबईत बुधवारी व गुरुवारी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आर्द्रता २० टक्क्यांनी वाढली सर्वसाधारणरीत्या मुंबईची आर्द्रता साठ ते सत्तर टक्के आणि कमाल तापमान २८ ते ३० अंशांच्या आसपास नोंदविण्यात येते. मात्र वातावरणातील बदलामुळे या दोन्ही घटकांत चांगलीच वाढ झाल्याने मुंबई बेहाल झाली आहे. कमाल तापमान ३५ अंश नोंदविण्यात आले, तर आर्द्रताही ८९ टक्के नोंदविण्यात आली.

टॅग्स :मुंबई