Video : काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विक्रोळीत झाड कोसळलं, सुदैवाने महिला थोडक्यात बचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 04:42 PM2021-05-18T16:42:15+5:302021-05-18T16:43:30+5:30

CCTV Footage : ही घटना जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काळजाचा ठोका चुकवणारे हे दृश्य लोकमतच्या हाती लागले आहे. 

A heartbreaking! At Vikhroli tree fell, fortunately the woman survived | Video : काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विक्रोळीत झाड कोसळलं, सुदैवाने महिला थोडक्यात बचावली

Video : काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विक्रोळीत झाड कोसळलं, सुदैवाने महिला थोडक्यात बचावली

googlenewsNext
ठळक मुद्दे विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यासमोर देखील अशाचप्रकारे एक झाड कोसळलं. महिलेचे दैव बलवत्तर होतं म्हणून सुदैवाने ती थोडक्यात बचावली.

मुंबईत तोक्ते चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मोठं मोठ्या झाडांची पडझड झाली आहे. या झाडांच्या पडझडीत खूप  नुकसान झालं आहे. तसेच काही ठिकाणी नागरिक गंभीर जखमी देखील झाले आहेत. विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यासमोर देखील अशाचप्रकारे एक झाड कोसळलं. महिलेचे दैव बलवत्तर होतं म्हणून सुदैवाने ती थोडक्यात बचावली. ही घटना जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काळजाचा ठोका चुकवणारे हे दृश्य लोकमतच्या हाती लागले आहे. 

 

सीसीटीव्ही फूटेजमधील दृश्यात विक्रोळीतील पार्कसाईट पोलीस ठाण्यासमोरुन सूर्यनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेलं मोठं झाड कोसळलं. यावेळी या झाडाखालून दोन तीन पादचारी जाताना दिसत आहेत. दरम्यान एक महिला छत्री घेऊन अगदी झाड कोसळत असताना त्याच्या खाली आली होती. परंतु मोठा आवाज झाल्याने प्रसंगावधान दाखवत ती मागे धावत गेल्याने तिचे प्राण वाचले आहेत. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेत महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे. त्याचवेळी हे झाड कोसळून पोलिसांच्या गाडीसह आजूबाजूचे किरकोळ नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 

त्याचप्रमाणे वरळी परिसरातील जोरदार पावसामुळ झाड कोसळलं. यामध्ये रोहणी खरात या ४० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोहिणी यांना दोन लहान मुलं आहेत. त्या छोटामोठा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. मात्र, विक्रोळीतील हा घटनेच्या सीसीटीव्हीतील दृश्य काळजाचा ठोका चुकवणारी आहेत. 

 

 

Read in English

Web Title: A heartbreaking! At Vikhroli tree fell, fortunately the woman survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.