मुंबई: प्रेयसीशी चॅटिंग केल्याच्या रागातून विवाहित तरुणाचे अपहरण करुन त्याला मारहाण करणारा शुभम जुवटकर हा अभिलेखावरील आरोपी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मालवणसह अन्य पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात मारहाण, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. घाटकोपर काजू टेकडी परिसरात आरोपी शुभम जुवटकर राहण्यास आहे. प्रेयसीशी विवाहित तरुण संदीप शिंदे चॅटिंग करत असल्याच्या रागातून जुवटकरने शिंदेचे अपहरण करुन त्याला घाटकोपर येथील एका खोलीत डांंबले. मारहाणीनंतर गयावया करणाऱ्या संदीपचे व्हीडीओ काढत ते सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केले होते. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाण आणि आयटी अॅक्टखाली त्याच्यासह सात जणांविरोधात गुन्हे दाखल केले. सतीश खोपडे (२७), दिनू सिंंघ (२१), प्रथमेश शेडगे (१९) सह दोघा अल्पवयीन आरोपींना घाटकोपर पोलिसांनी अटक केली. मुख्य सूत्रधार जुवटकर हा अद्याप फरार आहे. घाटकोपर येथे गेल्या वर्षी भररस्त्यात कॉलेजला जाणाऱ्या सनी कुहाडे या विद्यार्थ्याकडे पैशाची मागणी करत त्याला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यासह चौघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय दाखल असलेल्या अन्य गुन्ह्यांप्रकरणी अधिक तपास अंधेरी पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)
‘तो’ प्रियकर अभिलेखावरील सराईत आरोपी
By admin | Updated: July 17, 2015 02:27 IST