Join us  

हार्बरचे वेळापत्रक विस्कळीतच, सलग तिस-या दिवशी प्रवाशांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 1:34 AM

शहरातील हार्बर मार्गाचे वेळापत्रक सलग तिस-या दिवशीही विस्कळीत होते. सोमवारी, मंगळवारी सकाळी अप मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर, मंगळवारी रात्रीपासून रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात आला होता.

मुंबई : शहरातील हार्बर मार्गाचे वेळापत्रक सलग तिस-या दिवशीही विस्कळीत होते. सोमवारी, मंगळवारी सकाळी अप मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर, मंगळवारी रात्रीपासून रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, हे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे, बुधवारी पहाटेपासून हार्बर लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले. तब्बल २३ लोकल रद्द करण्यात आल्या. परिणामी, हार्बरवरील प्रवासासाठी ३० मिनिटांहून अधिक लेटमार्क लागत होता.मध्य रेल्ेव प्रशासनाने मंगळवारी रात्री गोवंडी ते चेंबूर स्थानकांदरम्यान अप मार्गावर रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. हा ब्लॉक पहाटे ४ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित होते. हे काम मशिनच्या साहाय्याने पहिल्यांदाच या भागात केल्यामुळे, येथील लोकलच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली, तसेच ब्लॉक हा पहाटे उशिरा संपल्याने लोकल खोळंबल्या. एकामागोमाग एक लोकलच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे प्रशासनाच्या कामतील विलंबामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप झाला.‘मरे’ला धूरक्याचा फटकाहार्बर रेल्वे मार्गासह मध्य रेल्वे मार्गावरील कसारा, कर्जत, खोपोली स्थानकातून सीएसएमटीकडे येणाºया लोकलही बुधवारी २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. हवेतील दृश्यमानता कमी असल्यामुळे समोरील सिग्नलदेखील दिसत नाही. परिणामी, लोकलचा वेग मंदावतो, असे रेल्वेच्या एका अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :मुंबई लोकल