Join us  

हार्बर बोरीवलीपर्यंत नेणार, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे समस्यांचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 1:44 AM

सीएसएमटी - पनवेल दरम्यान फास्ट इलेव्हटेड कॉरिडॉर विकसित करणे, पनवेल ते विरार दरम्यान नवीन उपनगरीय कॉरिडॉर विकसित करणे, हार्बर लाइन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढविणे आदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मागण्यांना रेल्वे बोर्डाच्या बैठकीत लवकरच मान्यता देण्यात येईल, असे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आज येथे सांगितले.

मुंबई : सीएसएमटी - पनवेल दरम्यान फास्ट इलेव्हटेड कॉरिडॉर विकसित करणे, पनवेल ते विरार दरम्यान नवीन उपनगरीय कॉरिडॉर विकसित करणे, हार्बर लाइन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढविणे आदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मागण्यांना रेल्वे बोर्डाच्या बैठकीत लवकरच मान्यता देण्यात येईल, असे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आज येथे सांगितले.मुंबईतील रेल्वे समस्यांबाबत सह्याद्री अतिथीगृहावर दोघांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी लोअर परेल, खार रोड, गोरेगाव, मीरा रोड, विरार, घटकोपर, डोंबिवली, नालासोपारा, भाईंदर, मुलुंड, डोंबिवली, भांडुप, वडाळा रोड, सायन, जीटीबी नगर, चेंबूर, शाहाड या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात यावे, आदी मागण्या मुख्यमंत्र्यांनी केल्या त्या तत्काळ मान्य करण्याचे आश्वासन गोयल यांनी दिले.मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहभागातून मुंबईत रेल्वेची विविध कामे हाती घेण्यात येत आहेत. रेल्वे मंत्रालयाकडे या सर्व प्रकल्पांबाबत पाठपुरावा करणे व या प्रकल्पाबाबत राज्य शासनाकडील निर्णय घेण्याचे दृष्टीने वरिष्ठ अधिकाºयांची समिती स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :पीयुष गोयल