"हरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी"? राऊतांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 09:32 AM2020-09-09T09:32:58+5:302020-09-09T09:42:25+5:30

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना हरामखोर असा शब्द वापल्याने वाद अधिकच चिघळला होता. त्यानंतर हरामखोर याचा अर्थ नॉटी असा होतो, असे सांगत राऊतांनी सारवासारव केली होती

"Haramkhor means naughty, then Sanjay Raut means nappy"? Bouchery criticizes Raut | "हरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी"? राऊतांवर बोचरी टीका

"हरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी"? राऊतांवर बोचरी टीका

googlenewsNext
ठळक मुद्देहरामखोर याचा अर्थ नॉटी असा होतो, असे सांगत राऊतांनी केली होती सारवासारव या युक्तिवादावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला टोलाहरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी? निलेश राणे यांनी केली विचारणा

मुंबई - सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. एकीकडे शिवसेनेने कंगनाने मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे, असे सांगत या वादाला मराठी अस्मिता आणि मुंबईच्या सन्मानाशी जोडले आहे. तर दुसरीकडे कंगनाही शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना हरामखोर असा शब्द वापल्याने वाद अधिकच चिघळला होता. त्यानंतर हरामखोर याचा अर्थ नॉटी असा होतो, असे सांगत राऊतांनी सारवासारव केली होती. दरम्यान, या युक्तिवादावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

निलेश राणे यांनी मंगळवारी एक ट्विट करून संजय राऊत यांना चिमटा काढला आहे. हरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी? अशी विचारणा निलेश राणे यांनी केली आहे. तसेच कम्पाऊंडरची औषधे खाऊन खाऊन संजय राऊतांची अशी अवस्था झाली आहे, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. 



अमृता फडणवीस यांनीही संजय राऊत यांना लगावला होता टोला

आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत असं सांगत अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टोला लगावला होता. अमृता फडणवीस यांनी याआधीही कंगना प्रकरणावरुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. कंगनाच्या पोस्टरला शिवसैनिकांनी जोडेमारो आंदोलन केले होते. त्यावर त्यांनी म्हटलं होतं की, आपण एखाद्याच्या मताशी सहमत असू शकत नाही. मात्र तरीही आपण लोकशाहीने दिलेल्या मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा मान राखला पाहिजे. बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, चळवळ करण्याचे आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याच्या मताशी असहमत असाल तर त्याला प्रतिवाद करा. पण म्हणून विरोधी मत व्यक्त करणाऱ्याच्या पोस्टरला चपलांनी मारणे हे काही योग्य नाही असं सांगत त्यांना कंगनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता.


राऊत म्हणाले होते, 'माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला

यापूर्वी संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर, असे म्हटले होते.  आता यावर स्पष्टिकरण देताना, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कंगना थोडी नॉटी आहे. मी तिची वक्तव्ये पाहिली आहेत. ती साधारणपणे, असे बोलतच असते. कंगना नॉटी गर्ल आहे. माझ्या भाषेत मला तिला बेईमान म्हणायचे होते आणि असे म्हणण्यासाठी आम्ही त्या शब्दाचा (हरामखोर) वापर करतो. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

Web Title: "Haramkhor means naughty, then Sanjay Raut means nappy"? Bouchery criticizes Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.