Join us  

रस्ता रुंदीकरणातील बांधकामांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:44 PM

महापालिकेची कारवाई : लालचक्की परिसरात १५ पेक्षा जास्त बांधकामे तोडली

उल्हासनगर : शहरातील लालचक्की परिसरात रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या १५ पेक्षा जास्त बांधकामांवर महापालिकेने सोमवारी हातोडा चालवला. या कारवाईनंतर इतर बांधकामधारकांनी स्वत:हून बांधकामे काढण्यास सुरुवात केली आहे. कॅम्प नं. ४ मधील व्हीनस चौक, लालचक्की चौकमार्गे छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाकडे जाणाºया या रस्त्याचे मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) दोन वर्षांपासून काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामात बांधकामांचा अडथळा येत असल्यामुळे हे काम रखडले आहे.

उल्हासनगरमध्ये सुरू असलेल्या या रस्त्यासाठी ११० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात येणार आहे. मात्र, बाधित बांधकामांवर पालिकेकडून कारवाई होत नसल्याने हे काम रखडल्याचे एमएमआरडीएकडून वारंवार सांगितले जात होते. वीर कोतवाल चौक तसेच छत्रपती उड्डाणपुलासमोरच रस्ता खोदल्यामुळे सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ५ ते ७ या रहदारीच्या वेळेत येथे प्रचंड वाहतूककोंडी होत होती. अखेर, या रस्त्याच्या आड येणाºया बांधकामांवर सोमवारी महापालिका अतिक्रमण विभागाने हातोडा चालवून १५ पेक्षा जास्त दुकाने हटवली. व्हीनस चौक येथे रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाºया बांधकामांवर कारवाई झाल्याने आता हे काम लवकर मार्गी लागेल, असा विश्वास पालिका अधिकारी गणेश शिंपी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या रस्त्याशेजारील नाले अद्याप बांधले नसून रस्त्याखाली दबलेल्या जलवाहिन्यांमधून गळती होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.एक किमी लांबीच्या रस्ता रुंदीकरणाला दोन वर्षांचा कालावधी लागत असल्याने सर्वस्तरांतून टीका होत होती. संथगतीने चालणाºया या कामामुळे रस्तेच नको असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. एमएमआरडीएमार्फत शहाड ते मुरबाड रस्ता, विठ्ठलवाडी रेल्वेस्टेशन रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भारतनगर रस्ता, कैलास कॉलनी ते गायकवाडपाडा रस्ता, बिर्ला मंदिर ते कटकेश्वर मंदिर रस्ता, व्हीनस चौक ते छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल रस्ता आदी रस्ते ११० कोटींच्या निधीतून बांधण्यात येत असून अनेक कामे रखडली आहेतएमएमआरडीएचे रस्ते निकृष्टएमएमआरडीएच्या निधीतून बांधण्यात येत असलेल्या रस्त्याला तडे गेल्याचे चित्र शहरात आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाच रस्त्यावरील सिमेंटचा थर उखडला असून तडे गेले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महापालिका बांधकाम विभागाकडे रस्त्याच्या कामांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार आहेत. मात्र, याबाबत पालिका व नगरसेवक याविरोधात एक शब्दही काढत नसल्याचे चित्र शहरात आहे.

टॅग्स :उल्हासनगरवसई विरार