Join us  

हज यात्रेकरूंच्या परतीच्या प्रवासाला प्रारंभ, शेवटचे विमान २६ सप्टेंबरला येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 6:31 AM

मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र हज यात्रेला गेलेले यात्रेकरू परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.

मुंबई : मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र हज यात्रेला गेलेले यात्रेकरू परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. हज यात्रेकरूंना मुंबईत मदिना येथून आणणारे विमान १२ सप्टेंबरपासून सुरू होत असून, शेवटचे विमान २६ सप्टेंबरला मुंबईत उतरेल.१ लाख २८ हजार ६९० यात्रेकरू यंदा भारतातून हज यात्रेला गेले आहेत. शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ३९ हजार २१० यात्रेकरू देशात परतले असून, उर्वरित ८९ हजार ४८० यात्रेकरू पुढील काळात देशात परततील, अशी माहिती केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मक्सूद अहमद खान यांनी दिली.हज यात्रेकरूंची व्यवस्था पाहण्यासाठी तैनात पथकातील गर्भवती महिला डॉक्टरची प्रसूती हजच्या कालावधीत झाली. हजच्या पथकात अशा प्रकारे कर्तव्यावर गर्भवती महिलला तैनात कसे करण्यात आले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. हज यात्रेला गेले असताना ६ जणांची प्रसूती सौदी अरेबियात झाली, तर १३५ जणांचे सौदीमध्ये असताना निधन झाले आहे.

टॅग्स :हज यात्रा