Join us  

आनंदी बालपणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, क्राय संस्थेने नोंदवला जागतिक विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 6:51 PM

लहान मुलांवर करण्यात येणाऱ्या अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर येत असताना मुंबईत लहान मुलांच्या आनंदासाठी एक अनोखा विक्रम रचण्यात आला आहे.

मुंबई -लहान मुलांवर करण्यात येणाऱ्या अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर येत असताना मुंबईत लहान मुलांच्या आनंदासाठी एक अनोखा विक्रम रचण्यात आला आहे. क्राय(चाइल्ड राइट्स अँड यू) याबालकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेने लहान मुलांच्या आनंदी बालपणाच्या हक्कासाठी एकता दर्शवण्याच्या हेतूने सर्व क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. याला मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने या अनोख्या उपक्रमाची गिनीज बुकात नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील नामांकीत सेंट.झवीयर्स या महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला होता यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी हातात सॉक-पपेट्स घालून या उपक्रमात सहभाग नोंदवला.यापूर्वी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे अशा प्रकारच्या उपक्रमाची गिनीज बुकात नोंद करण्यात आली होती. तर भारतात यावर्षी बालदिनाचा एक भाग म्हणून महिनाभर क्रायने सुरू केलेल्या अभियानाचाच हा एक मुख्य उपक्रम असल्याचे क्रायकडून सांगण्यात आले आहे. या उपक्रमात अनेकांना सहभागी करून घेऊन विविध उपक्रमांच्या माध्यमांतून बालकांबद्दल आणि त्यांच्या आनंदी बालपणाच्या हक्काबद्दल जनजागृती करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट होते. या उपक्रमांमध्ये लोकांना येलो फेलोज बनून बालकांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.  हे अभियानात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सोशल मीडियाचा देखील खुबीने वापर करण्यात आला. यामध्ये पर्याय अवलंबण्यात आला. या अभियानाने लोकांना शक्य तितक्या लोकांनी पिवळे मोजे घालून स्वतःचा फोटो सोशल मीडियावर टाकण्याचे आणि या अभियानामध्ये सहभागी करून घेण्यासाठी तीन किंवा अधिक मित्रांना टॅग करण्याचे आवाहन करण्यात आले. देशभरात अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले यामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद व चेन्नई अशा मेट्रो शहरांचा सामावेश होता. त्यामध्ये शॉपिंग मॉलमध्ये आयोजित केलेले फ्लॅश मॉब्स व कॉलेजांतील विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी अधिक चांगले जग निर्माण करण्याची प्रतिज्ञा करण्यासाठी सेलिब्रेटी व युवकही पुढे आल्याचे सांगण्यात आले.------------------------संध्याकाळी, पाणी साठवण्याच्या टाक्या, कॅन, काठ्या, काचेच्या बाटल्या, धातूच्या कॅप अशा साहित्यापासून वाद्ये बनवून त्यातून संगीत निर्माण करणाऱ्या धारावी रॉक्स या झोपडपट्टीय मुलांनी तयार केलेल्या रॉक बँडने उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर केले.क्रायच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, बालकांसाठी कृती करण्यासाठी लोकांना उत्तेजन देणे, ही या कार्यक्रमाची कल्पना आहे. या उपक्रमाच्या केंद्रस्थानी उत्साह व आनंद यांचे प्रतिक असणारा पिवळा रंग आहे. भारतातील सर्व बालकांना याचा अनुभव घेण्याची संधी मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे. क्रेयान रबाडी,क्राय-वेस्टच्या प्रादेशिक संचालक