Join us  

जीएसटी महसुलात आॅगस्टमध्ये १५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 4:44 AM

मुंबई मध्य विभागाची कामगिरी; ६८ कोटी रुपये कररूपात झाले जमा

- खलील गिरकर मुंबई : मुंबई मध्य विभागातील सीजीएसटी, एसजीएसटी व आयजीएसटी या तिन्ही प्रकारातील वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून सरकार दरबारी जमा झालेल्या महसुलात आॅगस्ट महिन्यात १५.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. आॅगस्ट, २०१८ मध्ये या विभागात ७६८ कोटी रुपये कराच्या रूपात जमा झाले आहेत. गतवर्षी आॅगस्ट महिन्यात हे प्रमाण ६६५ कोटी रुपये होते.जीएसटी लागू झाल्यानंतर या विभागात गतवर्षी ७ हजार ५ कोटी रुपयांचा महसूल सीजीएसटी, एसजीएसटी व आयजीएसटीच्या रूपात जमा झाला होता. यंदा विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे त्यात वाढ झाली आहे. मुंबई मध्य विभागात गतवर्षी १५ हजार जणांनी करदाते होते. त्यामध्ये वर्षभरात सुमारे दुप्पट वाढ झाली असून, यंदा सुमारे २६ हजारपेक्षा जास्त करदात्यांनी महसूल जमा केला आहे. जीएसटीमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत, जीडीपीमध्ये वाढ होत आहे, विभागातर्फे जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात, त्या सर्वांमुळे जीएसटी भरणा वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई मध्य विभागामध्ये मलबार हिल, आॅपेरा हाउस, धारावी, वरळी, माटुंगा, दादर, बीपीसीएल, हाजी अली यासह इतर विभागाचा समावेश होतो. विमा कंपन्या व आर्थिक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचा यात सर्वात जास्त भरणा आहे.करचुकवेगिरी करणाºयांविरोधात विभागाने कारवाईचे पाऊल उचलले आहे. या क्षेत्रातील करचुकवेगिरी करणाºयांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करून, असे प्रकार बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जे करदाते अचानकपणे फाईल करणे थांबवितात, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून आम्ही कार्यवाही करतो. क्रेडिट व्हेरिफिकेशनमुळे अनेक बाबींचा उलगडा होतो.- डॉ. के. एन. राघवन, आयुक्त, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग, मुंबई (मध्य)

टॅग्स :जीएसटीमुंबईव्यवसाय