Join us  

‘बंद’मुळे आजीच्या अंत्यदर्शनाला जाता आले नाही; एसटी प्रवाशाची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:00 AM

मराठा आंदोलनाचा असाही फटका, सेंट्रल आगारातून केवळ ५० फेऱ्या मार्गस्थ

मुंबई : आज सकाळी साडेआठ वाजता मला गावावरून फोन आला, माझ्या आजीचे निधन झाल्याचे मला कळाले. मला माझ्या आजीच्या अंत्यदर्शनासाठी जायचे आहे. मात्र एसटी उपलब्ध नसल्याने मी मुंबई सेंट्रल ते श्रीवर्धन असा प्रवास करू शकत नसल्याची खंत प्रवासी अपेक्षा दांडेकर यांनी व्यक्त केली. मराठा मोर्चेकऱ्यांनी मुंबई बंदची हाक दिल्यामुळे मुंबई सेंट्रल येथील एसटी सेवादेखील ठप्प झाली होती.पवई येथे राहणाºया अपेक्षा दांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आम्हाला गावावरून फोन आला. या वेळी आजीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे माझी आई तातडीने श्रीवर्धनला रवाना झाली. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता आम्हाला गावावरून नातेवाइकांनी फोनवर आजीचे निधन झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच आम्ही श्रीवर्धनला जाण्यासाठी निघालो.खासगी बस आणि रेल्वे बंद असल्याची माहिती मिळाल्यामुळे किमान एसटी तरी सुरू असेल याआशेने आम्ही मुंबई सेंट्रल बस स्थानकावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आलो. मात्र येथे आल्यावर एसटी बंद असल्याची माहिती मिळाली. नियंत्रण कक्षाकडे विचारणा केली असता त्यांनीदेखील एसटी कधी सुरू होईल याबाबत सांगितले नाही. मला माझ्या आजीच्या अंत्यदर्शनाला जायचे आहे, मात्र वाहतूक सुरू नसल्यामुळे जाता येत नसल्याची व्यथा अपेक्षा यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. राज्यभर सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी सेवा कोलमडली होती. दररोज तब्बल २६५ एसटी फेºया सुटणाºया मुंबई सेंट्रल आगारातून ‘बंद’मुळे केवळ ५० फेºया मार्गस्थ झाल्या. मात्र, यामुळे एसटीने प्रवास करू इच्छिणाºया प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. 

टॅग्स :मुंबई बंदमराठा क्रांती मोर्चा