Join us  

नातवंडांनी पिगी बँकमध्ये जमलेली रक्कम दिली राम मंदिर उभारणीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2021 5:49 PM

इयत्ता सहावीतला पार्थ वैद्य व नववीतील व तनिष्का वैद्य या लहानग्यांनाही राम मंदिराबद्धल विशेष आस्था आहे.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : अयोध्येत जागतिक कीर्तिचे राम मंदिर भविष्यात उभारणार आहे. मुंबई, देशासह जगातून श्रीराम भक्त राम मंदिर उभारणीसाठी देणगी देत आहे. मात्र गोरेगाव येथील दोन चिमुरड्यांनी नातवंडांनी त्यांच्या पिगी बॅंकेत जमा झालेली रक्कम चक्क राम मंदिर उभारणीसाठी देऊन खारीचा वाटा उचलला.

केशवसृष्टी उभारण्यात मोलाची कामगिरी करणारे गोरेगावचे संघचालक व कारसेवक कै. स.दि. उर्फ दादा वैद्य यांच्या नातवंडांनी पिगी बँकमध्ये जमलेली रक्कम नातवंडांनी श्री राम मंदिर उभारणीसाठी दिली.निधी संकलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी पिगी बँकमध्ये जमलेली संपूर्ण रक्कम देणगी देऊन सुखद धक्का दिला.

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी राम मंदिर उभारणीसाठी एक लाख रुपये देणगी दिल्यानंतर त्यांच्या  गोरेगाव पूर्व जयप्रकाश नगर येथील शिवस्मृती इमारतीतीतील रहिवाश्यांसाठी कार्यकर्त्यांनी संपर्क साधला असता राम नाईकांच्या शेजारी राहणाऱ्या वैद्यांनी सुखद धक्का दिला.

इयत्ता सहावीतला पार्थ वैद्य व नववीतील व तनिष्का वैद्य या लहानग्यांनाही राम मंदिराबद्धल विशेष आस्था आहे. त्यांनी आपल्या आजोबांना पाहिले देखिल नसेल,पण आई व बाबांमार्फत त्यांना या विषयाची खूपच माहिती असल्याचे संपर्क कार्यकर्ते मेघा तगर्षी व केदार फणसाळकर यांच्या लक्षात आली. आपले बाबा माधव वैद्य हे देखिल कॉलेजमध्ये असतांना कारसेवक म्हणून गेले होते असे या दोघांनी अभिमानाने सांगितले.

घरात खाऊ व बक्षिसाचे पैसे मुले पिगी बँकेत जमा साठवतात.पार्थ व तनिष्का याला अपवाद नाही.कार्यकर्ते घरी आल्यावर त्यांनी आपल्या पिगी बँक उघडली.तनिष्काच्या पेटीतून  पाचशे हजार रुपये व पार्थच्या पेटीतून एक रुपये निघाले असता त्यांनी सदर रक्कम राम मंदिर उभारणीसाठी दिली.याच इमारतीत राहणाऱ्या नव्वदीतील कमला वझे या अयोध्येला कारसेवक म्हणून गेल्या होत्या. त्यांच्या बचतीतील एक हजार रुपयांची देणगी देऊन राम मंदिर उभारणीचे स्वप्न साकार झाल्याबद्धल ऋतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :राम मंदिर