मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील शाळांमध्ये शिकवणाऱ्या बी.पी.एड. पदवीधर शिक्षकांना (क्रीडा शिक्षकांना) प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. पालिकेने केवळ बी.एड. पदवीधर शिक्षकांना ही वेतनश्रेणी लागू केली आहे. त्यामुळे क्रीडा शिक्षकांमध्ये दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना आहे.क्रीडा शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीमधून वगळून महापालिका अन्याय करत असल्याचे पत्र परिषदेने शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना लिहिले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या शिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून प्रशिक्षित पदवीधरांना वेतनश्रेणी व वेतन निश्चितीबाबत निर्देश दिले आहेत. मात्र या परिपत्रकात बीपीएड पदवीधर शिक्षक म्हणजेच क्रीडा शिक्षकांचा उल्लेख नाही. परिणामी, पदवीधर वेतनश्रेणीच्या लाभापासून क्रीडा शिक्षकांना वंचित राहावे लागत आहे.
पदवीधर वेतनश्रेणी देण्याची क्रीडा शिक्षकांची मागणी
By admin | Updated: August 22, 2015 01:07 IST