लय भारी! आजी हरवली, नातवाने शक्कल लढवली; नेकलेसमधल्या GPS ट्रॅकरने घेतला शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:15 IST2025-12-09T11:14:27+5:302025-12-09T11:15:39+5:30
मुंबईतील एका कुटुंबाने अतिशय हायटेक पद्धतीचा वापर करून आजीचा शोध घेतला आहे.

लय भारी! आजी हरवली, नातवाने शक्कल लढवली; नेकलेसमधल्या GPS ट्रॅकरने घेतला शोध
मुंबईतील एका कुटुंबाने अतिशय हायटेक पद्धतीचा वापर करून आजीचा शोध घेतला आहे. नातवाने त्याच्या ७९ वर्षीय आजीच्या नेकलेसमध्ये एक छोटा जीपीएस ट्रॅकर बसवला, ज्यामुळे नंतर तिचं लोकेशन शोधण्यात आलं.
दक्षिण मुंबईत संध्याकाळी फिरायला जाताना वृद्ध महिला अचानक बेपत्ता झाली, ज्यामुळे तिचे कुटुंब खूप त्रस्त झालं. त्यानंतर आजीच्या नातवाने अत्यंत फिल्मी पद्धतीने आजीचा शोध घेतला. त्याने तिच्या नेकलेसमध्ये लावलेला जीपीएस ट्रॅकर वापरून तिला शोधलं. ट्रॅकरची माहिती शेअर केलेली नाही.
जीपीएस डिव्हाईसची घेतली मदत
३ डिसेंबर रोजी शिवडी परिसरात सायरा बी. ताजुद्दीन मुल्ला यांना एका बाईकने धडक दिली. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात नेलं. जेव्हा वृद्ध महिला रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही, तेव्हा कुटुंबीय घाबरले. नातू मोहम्मद वासिम अयूयुब मुल्ला याने जीपीएस डिव्हाईसची मदत घेतली.
घरापासून ५ किमी अंतरावर होती आजी
जीपीएसने महिलेचं लोकेशन हे परळमधील केईएम रुग्णालय असल्याचं दाखवलं, जे त्यांच्या घरापासून फक्त ५ किमी अंतरावर आहे. त्यानंतर वृद्ध महिलेचं संपूर्ण कुटुंब तिला जाऊन भेटलं आणि उपचारासाठी तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर केलं.
ऑनलाईन आणि ऑफलाईन असंख्य मिनी जीपीएस ट्रॅकर्स उपलब्ध आहेत. काही ट्रॅकर एपल एअरटॅगसारखं काम करतात, ज्यामुळे ते कोणत्याही रिचार्ज प्लॅनशिवाय वापरता येतात. एपल एअरटॅग हजारो किलोमीटर अंतरावरूनही त्याचं लोकेशन शेअर करतो.