अजित पाटील - उरण
विरार ते अलिबाग या उरण तालुक्यातील चिरनेर, कोप्रोली, आवरे मार्गे रेवस 12 पदरी वैविध्यपूर्ण रस्त्याचे काम सुरू होत आहे. त्यामुळे उरणच्या महामुंबई सेझमधून वाचलेल्या शेतजमिनींना कोटय़वधींचा भाव मिळू लागला आहे. या भागात नव्या कॉरिडोर रस्त्याला लागून मोठय़ा प्रमाणात उद्योग व्यवसाय उभे राहणार असल्याने भांडवलदारांनी गुंतवणुकीसाठी उरण तालुक्यातील शेतजमिनींकडे आपला मोर्चा वळवला आहे.
अलिबाग ते विरार या सुमारे 14क् किमी अंतराच्या 12 मार्गिकांच्या रस्त्याचे काम प्रस्तावित आहे. या प्रस्तावित मार्गाच्या बांधकामाकरिता एमएमआरडीएच्या मार्फत आखणी सुरू आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विरार ते जेएनपीटी या 76 किमीचे काम केले जाणार आहे. हा रस्ता 2क्17 र्पयत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दुसरा टप्पा हा चिरनेर ते अलिबाग असा असून चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली पिरकोन, पाले आणि आवरे या गावांच्या महसुली विभागाकडून दुस:या टप्प्यातला रस्ता आवरे ते रेवस या मार्गावरील पुलाच्या माध्यमातून जोडला जाणार आहे.
अलिबागवरून विरारला जायला 5 ते 6 तासांचे अंतर लागत आहे, ते या नव्या मार्गामुळे अवघ्या 2 तासांवर येणार आहे. एकूण प्रकल्पासाठी 1261 हेक्टर जमीन नव्याने संपादन करावी लागणार असून त्यासाठी सुमारे 8 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
12 लेनच्या या एकूण 14क् किमीच्या रस्त्याने अहमदाबाद-गोवा आणि नाशिक, पुणो, नवी मुंबई, अलिबाग ही शहरे जवळ येणार असल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या काही दिवसात मोठय़ा प्रमाणात जोर धरण्याची शक्यता बळावली आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई, पुणो, दिल्ली, बंगळूर आणि गुजरात आदी ठिकाणच्या भांडवलदारांनी आपला मोर्चा सध्या उरण तालुक्याच्या पूर्व विभागातील शेतजमिनींकडे वळविल्याचे दिसून येत आहे.
शेतजमिनींना थेट दीड कोटीपासून ते अडीच कोटी रुपयांर्पयत एकरी भाव देण्याच्या वार्ता भांडवलदारांच्या दलालांकडून केल्या जात आहे. मागील काही दिवसांपासून जमिनीची दलाली करणारे शेतकरी आणि त्यांचे नातेवाईक यांना भेटू लागले आहेत. पूर्वी या भागात जमीन खरेदी करताना शेतजमिनीवर येणा:या प्रकल्पामध्ये शेतक:यांच्या वारसांना नोकरी लागावी यासाठी नोटिसा दिल्या जात होत्या. आता जमिनींचा भाव वधारल्याने भांडवलदार अधिक पैसे द्यायला तयार आहेत.
हेक्टरी अडीच कोटी
4काही वर्षापूर्वी महामुंबई सेझच्या निमित्ताने केवळ अडीच लाख रुपये हेक्टरी या भावाची जमिनीची किंमत थेट अडीच कोटी रुपये हेक्टरी या दरार्पयत पोहोचली आहे. त्यामुळे भांडवलदार या परिसरात केवळ गुंतवणूक म्हणून स्वस्तात जमिनी शोधू लागले आहेत.
4मात्र आपल्या परिसरातून अलिबाग ते विरार हा रस्ता प्रस्तावित असल्याने कोणीही शेतकरी आपल्या जमिनी स्वस्तात विकायला तयार नसल्याचे परिसरात दिसून येत आहे.