Join us  

देवी विराजमान होणार इकोफ्रेंडली मखरात; ‘उत्सवी’ संस्थेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 5:57 AM

राज्य शासनाने प्लॅस्टिक आणि थर्माकोलबंदी जाहीर केली आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी अनेक मंडळांच्या देखाव्यात ‘पर्यावरण’, ‘प्लॅस्टिक बंद’, ‘स्वच्छता’ या विषयावर आधारित देखावे तयार केले जात आहेत.

मुंबई : राज्य शासनाने प्लॅस्टिक आणि थर्माकोलबंदी जाहीर केली आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी अनेक मंडळांच्या देखाव्यात ‘पर्यावरण’, ‘प्लॅस्टिक बंद’, ‘स्वच्छता’ या विषयावर आधारित देखावे तयार केले जात आहेत. यंदाचा नवरात्रौत्सव इकोफ्रेंडली करण्यासाठी काही मंडळे कागद आणि पुठ्ठ्यांपासून तयार करण्यात आलेल्या मखराचा वापर करत आहेत.गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्री इकोफ्रेंडली साजरा करण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे कागदापासून बनवलेल्या मखरात देवी विराजमान करण्यात येणार आहे. गणेश गल्ली, लालबाग या भागात ‘उत्सवी’ या संस्थेने कागदी मखरांचे प्रदर्शन भरविले आहे. कागदी आणि पुठ्ठ्यांचे मखर बनविण्यासाठी ‘उत्सवी’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. मागील १७ वर्षांपासून अधिक काळ या संस्थेमार्फत पर्यावरणपूरक मखरांची निर्मिती केली जाते. नवरात्रीमध्ये देवींच्या मखरासाठी मंडळाच्या मागणीप्रमाणे कलाकार मखरांची मांडणी, डिझाइन तयार करतात, असे उत्सवीचे संस्थापक नानासाहेब शेंडकर यांनी सांगितले. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची खूप हानी होते. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये, यासाठी कागदी मखर बनविण्यात येत असल्याचे शेंडकर यांनी सांगितले.घट बसविण्यासाठी या टोपल्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्याचप्रमाणे नक्षीकाम केलेल्या मातीच्या मडक्यांना मागणी असल्याचे दिसून येत आहे. ग्राहक आपल्या पसंतीप्रमाणे मडक्यांची खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.रांगोळी संकल्पनानवरात्री रंगाचा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नवरात्रीत रांगोळी खास आकर्षण असते. रांगोळीमधून पर्यावरणपूरक संदेश देऊन जनजागृती केली जाते.अंबेमातेच्या विविध शक्तीरूपांचे दर्शन करून देण्यासाठी रांगोळीतून नवमाताची प्रतिकृती स्वास्थ्यरंग संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याचे तेजस लोखंडे यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई