Join us  

जागतिक हवाई वाहतुक क्षेत्राला जून पर्यंत 61 बिलीयन डॉलर्स खर्च ,  निव्वळ तोटा 39 बिलीयन वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 5:07 PM

जागतिक हवाई वाहतुक क्षेत्राला जून पर्यंत 61 बिलीयन डॉलर्स खर्च ,  निव्वळ तोटा 39 बिलीयन वरलोकमत न्यूज नेटवर्क...

जागतिक हवाई वाहतुक क्षेत्राला जून पर्यंत 61 बिलीयन डॉलर्स खर्च ,  निव्वळ तोटा 39 बिलीयन वरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना मुळे जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रासमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. 30 जून पर्यंत जगभरातील विविध हवाई वाहतूक कंपन्यांचे 61 बिलीयन डॉलर्स खर्च होणार आहेत. तर कंपन्यांचा निव्वळ तोटा 39 बिलीयन डॉलर्स वर जाण्याची भीती इंटरनँशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए)  ने वर्तवली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तातडीने ठोस उपाय योजना आखण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. 

कोरोनापासून बचावासाठी जागतिक पातळीवर बहुसंख्य देशांमध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार वाढू लागल्याने हवाई वाहतूक चालू असतानाही अनेक प्रवाशांंनी तिकीटे रद्द केली होती त्यामुळे हवाई वाहतुकीला प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती व इतर प्रवाशांना परतावा देणे कंपन्यांना भाग पडले होते.  एकीकडे उड्डाणांवर प्रतिबंध लादल्याने विमान प्रवास ठप्प झाला आहे. मात्र विमान वाहतूक बंद असली तरी विमान वाहतूक कंपन्यांना दैनंदिन खर्च करावा लागत आहे.  विविध विमानतळांवर पार्क केलेल्या विमानांची देखभाल करणे, पार्किंग शुल्क व इतर अनेक बाबींसाठी खर्च करणे भाग आहे. त्यामुळे एकीकडे विमान प्रवास बंद असल्याने त्यामधून मिळणारे उत्पन्न ठप्प झालेले असताना खर्च मात्र सुरुच आहे. परिणामी विमान कंपन्यांना त्यांच्या शिलकीतील रक्कम या कामांवर खर्च करावी लागत आहे. 

अनेक देशांमध्ये दोन ते तीन महिने विमान सेवा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  विमान सेवा सुरु झाल्यानंतर देखील प्रवाशांचा ओघ नेहमीप्रमाणे होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. यामुळे वर्षभरातील विमान प्रवाशांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत 38 टक्केने घटण्याची शक्यता आहे. आयएटीए ने याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून परिस्थितीत सकारात्मक बदल झाला नाही तर अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त केली आहे.