प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान, किशोरी पेडणेकरांचा कंगनाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 04:55 PM2021-11-15T16:55:16+5:302021-11-15T17:17:02+5:30

देशाला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतवर जोरदार टीका होत आहे.

Giving Padma Shri to Kangana is an insult to Hindustan; End the subject by taking action against her, demand of Mumbai Mayor Kishori Pednekar | प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान, किशोरी पेडणेकरांचा कंगनाला टोला

प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान, किशोरी पेडणेकरांचा कंगनाला टोला

Next

मुंबई-

देशाला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतवर जोरदार टीका होत आहे. कंगनावर टीका करणाऱ्यांमध्ये आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचीही भर पडली आहे. कंगनाच्या वक्तव्याचा किशोरी पेडणेकर यांनी जोरदार समाचार घेतला. "प्लास्टिकच्या घोड्यावर बसून झाशीची राणी सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री पुरस्कार देणे हा तर अखंड हिंदुस्थानचा अपमान आहे. तिच्यावर कारवाई करा आणि विषय संपवा", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. त्या मुंबईत बोलत होत्या. 

"कंगना जन्मली कुठे, रोजीरोटी कमवायला येते कुठे आणि येथे येऊन माझ्या मुंबईची आणि महाराष्ट्राची बदनामी करते. पाकिस्तानशी तुलना करते. दर तीन महिन्यांनी प्रसिद्धीच्या झोतात ती यायला बघते", अशी जोरदार टीका पेडणेकर यांनी कंगनावर केली. 

"आपल्या देशात अनेक लोक आहेत की जे अतिशय चांगलं काम करतात. पण हिच्यात काय एवढं टॅलेंट आहे की तिला पद्मश्री पुरस्कार दिला गेला हे मला अजूनही समजलेलं नाही. कंगनाचं बेताल वक्तव्य म्हणजे स्वातंत्र्यासाठी आहुती दिलेल्या लोकांचा अपमान आहे. हा अखंड हिंदुस्तानचा अपमान आहे", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 

कंगनाच्या बेताल वक्तव्याची दखल घेऊन तिच्यावर तातडीनं कारवाई करायला हवी अशीही मागणी पेडणेकर यांनी यावेळी केली आहे. "माझी गृह विभााला हात जोडून विनंती आहे की त्यांनी अशा बेताल मुलीवर निट लक्ष द्यायला हवं. जी संपर्ण हिंदुस्थानचा अपमान करते आणि सर्व लोकांमध्ये फूट पाडते. तिचा निषेध आपेल्याला न्यायिक बाजूनं करावं लागेल. तिच्यावर कारवाई करुन विषय संपवून टाकायला हवा", असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 

Read in English

Web Title: Giving Padma Shri to Kangana is an insult to Hindustan; End the subject by taking action against her, demand of Mumbai Mayor Kishori Pednekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.