Join us  

प्रेयसीच्या मुलाची गोरेगावात हत्या

By admin | Published: February 01, 2015 1:36 AM

प्रेयसी हवी पण तिची मुले नको यावरून प्रेमी युगुलात सुरू झालेल्या वादाने भयानक टोक गाठले. मुलांची जबाबदारी स्वीकारली नाही तर मला लग्न करायचे नाही,

लग्नास नकार दिल्याने उगवला सूड : मारहाणीत चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यूमुंबई : प्रेयसी हवी पण तिची मुले नको यावरून प्रेमी युगुलात सुरू झालेल्या वादाने भयानक टोक गाठले. मुलांची जबाबदारी स्वीकारली नाही तर मला लग्न करायचे नाही, या प्रेयसीच्या भूमिकेमुळे संतापलेल्या प्रियकराने तिच्या ४ वर्षांच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली. गोरेगावच्या भगतसिंग नगरात शनिवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली.ताहिर छोटेखान (२५) असे प्रियकराचे नाव असून, बांगुरनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकल्या. हैदराबादेत राहणाऱ्या मात्र घटस्फोटीत असलेल्या २३वर्षीय तरुणीसोबत गेल्या आठेक महिन्यांपासून ताहिरचे प्रेमसंंबंध होते. हैदराबादेत दोघे सोबतच राहत होते. मात्र प्रेयसीची आधीची दोन मुले ताहिरला खटकत होती. या दोघांची जबाबदारी तो घेण्यास तयार नव्हता. अशात दोघे मुंबईत आले. तीन दिवसांपूर्वीच दोघांनी भगतसिंग नगरात भाड्याने खोली घेतली होती. ताहिर प्रेयसीकडे सतत लग्नाची मागणी करीत होता. मात्र मुलांची जबाबदारी स्वीकारणार असशील तरच लग्न करेन या भूमिकेवर ती अडून होती. त्यामुळे रागाच्या भरात ताहिरने प्रेयसीच्या दोन्ही मुलांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी ११च्या सुमारास ती महिला कामाच्या शोधात आपल्या दोन्ही मुलांना ताहिरकडे मोठ्या विश्वासाने ठेवून घराबाहेर पडली. ती संधी साधत प्रेयसीच्या ४ वर्षांच्या मुलाला (अयान) त्याने जबर मारहाण केली. ताहिरची मारहाण इतकी जबर व अमानुष होती की अयानने जीव सोडला. हा प्रकार प्रेयसीच्या मोठ्या मुलीने (अक्षा) पाहिला. दुपारच्या सुामरास प्रेयसी जेव्हा घरी परतली तेव्हा ताहिर अयानला घेऊन रुग्णालयात निघाल्याचे तिला दिसले. बेशुद्ध पडलेल्या आयानला जवळील सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)याआधीची घटना२६ जानेवारी - घटस्फोटीत प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्या ४ वर्षांच्या मुलाला बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसमोर फेकून ठार मारण्याचा प्रयत्न प्रियकराने केला होता. या अपघातात चिमुरडा बचावला; मात्र एका हाताने कायमचा अधू झाला.