Join us  

सॅण्डहर्स्ट रोड-मशीद स्थानकांदरम्यान तरुणीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 5:20 AM

लोकलमध्ये तरुणीच्या डोक्यावर बांबूने प्रहार करून मोबाइल चोरणा-या अल्पवयीन मुलाला पकडण्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांना यश आले आहे.

मुंबई : लोकलमध्ये तरुणीच्या डोक्यावर बांबूने प्रहार करून मोबाइल चोरणा-या अल्पवयीन मुलाला पकडण्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांना यश आले आहे. हल्लेखोर चोराने हा मोबाइल मशीद बंदर येथील रुक्सार अहमद बरगुया या महिलेला विकला होता. तिलाही अटक करण्यात आली आहे.द्रविता सिंग हिने बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी कल्याण येथून सकाळी ८ वाजून ०१ मिनिटांनी सीएसएमटीला जाणारी महिला विशेष लोकल पकडली. साडे नऊच्या सुमारास सॅण्डहर्स्ट रोड-मशीद स्थानकादरम्यान द्रविताला फोन आला. मात्र आवाज बरोबर येत नसल्याने ती दरवाजावर आली. या वेळी अल्पवयीन मुलाने लाकडी बांबूने द्रविताच्या डोक्यावर प्रहार केला. त्या जोरदार प्रहारामुळे द्रविता मोबाइलसह रेल्वे रुळावर पडली. तरुणी जखमी असताना आरोपीने तिचा १८ हजारांचा मोबाइल घेत पळ काढला. सीसीटीव्हीमुळे आरोपीची ओळख पटली.सीएसएमटी पोलिसांना गुरुवारी आरोपी सॅण्डहर्स्ट रोडला येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार प्रिमीयर गोल्ड सिनेमा थिएटर परिसरातून अल्पवयीन मुलाला अटक केली. त्याने मोबाइल मशीद बंदर येथे विकल्याचे सांगितले. तयाच्याकडून चोरीचा मोबाइल विकत घेणाºया महिलेला ताब्यात घेतल्याचे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे मध्य परिमंडळाचे उपआयुक्त समाधान पवार यांनी सांगितले. २४ तासांच्या आत सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण आणि पथकाने या गुन्ह्याचा उलगडा केला. जखमी मुलीवर उपचार सुरू आहेत.