Join us

गिरीश प्रभुणे यांना चतुरंग जीवनगौरव पुरस्कार

By admin | Updated: August 9, 2015 00:04 IST

भटक्या विमुक्त जाती, तसेच पारधी जमातीच्या पुनर्वसनासाठी सातत्याने झटणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना यंदाचा चतुरंग जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुंबई : भटक्या विमुक्त जाती, तसेच पारधी जमातीच्या पुनर्वसनासाठी सातत्याने झटणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना यंदाचा चतुरंग जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तीन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल जाहीर झालेला हा पुरस्कार डिसेंबर २०१५ मध्ये मुंबईत होणाऱ्या चतुरंग रंगसंमेलनात त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे, जीवनगौरव पुरस्काराचे यंदा २५ वे वर्ष असून, या पुरस्काराची रक्कम एक लाखावरून तीन लाख अशी करण्यात आली आहे. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकमताने गिरीश प्रभुणे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.