मुंबई : तिकिटांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वेने उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी मोबाइल तिकीट सेवा सुरू केली. २७ डिसेंबरपासून सेवा सुरू करताच २९ डिसेंबरपर्यंत या सेवेला थंड प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. मोबाइल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यात प्रवासी पुढे आणि तिकीट काढण्यात मागे असेच काहीसे चित्र दिसून आले आहे. तीन दिवसांत ७ हजार ५३७ जणांनी रेल्वेचे मोबाइल अॅप डाऊनलोड केले आहे. मात्र प्रत्यक्षात या मोबाइल सेवेतून अवघ्या ५९ तिकिटांची विक्री झाली असून, ४३0 रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे. २७ डिसेंबर रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दादर स्थानकात मोबाइल अॅपचा शुभारंभ करण्यात आला आणि या दिवसापासून प्रवाशांना सेवा देण्यास सुरुवात झाली. रेल्वेच्या क्रिसकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम) मोबाइल तिकीट सेवा उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र अॅप तयार करण्यात आले आहे. हे अॅप अॅण्ड्रोईड फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून तर विंडोज फोनवर विंडोज स्टोअरमधून डाऊनलोड करण्याची सोय आहे. प्रवाशाला सगळी नोंदणी प्रक्रिया पार पाडताना एक कायमस्वरूपी पासवर्डबरोबरच मोबाइल नंबर, नाव आणि शहराचे नाव यात नोंदवावे लागते. नोंदणीची सगळी प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर शून्य बॅलन्स आर-वॉलेट खाते युनिक लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे सुरू करावे लागेल. त्यानंतर प्रवाशाला यूटीएस बुकिंग काऊंटर्सवरून १00 रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंतचे आर वॉलेट रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली असून, रिचार्ज केल्यानंतर तिकीट बुक करून त्याची माहिती मोबाइलवर असलेल्या युनिक बुकिंग आयडीवर येते आणि मग स्थानकावर जाऊन युनिक बुकिंग आयडीद्वारे एटीव्हीएमवर प्रवाशांना तिकीट उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र २७ तारखेपासून सुरू झालेल्या या सेवेला २९ डिसेंबरपर्यंत अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. अवघ्या ३२ जणांनीच यूटीएस बुकिंग काऊंटरवरून रिचार्ज केले असून, यातून ५९ तिकिटांची विक्री झाली आहे. या तिकीट विक्रीतून रेल्वेला अवघे ४३0 रुपये उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये मध्य रेल्वेमार्गात ४९ तिकिटांची तर पश्चिम रेल्वेमार्गावर उर्वरित १0 तिकिटांची विक्री झाली आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवर १९ जणांनी रिचार्ज केले असून, पश्चिम रेल्वेमार्गावर १३ जणांनी रिचार्ज केल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवाशांना न समजणारी किचकट मोबाइल प्रक्रिया असून, त्यामुळेच प्रतिसाद मिळण्यास थोडा वेळ लागत असल्याची शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. २७ डिसेंबर २०१४ मोबाइल डाऊनलोड : १,३0५विभागरिचार्ज तिकीट उत्पन्नम. रेल्वे१५४४३१५प. रेल्वे 0२0२१0२८ डिसेंबर २०१४ मोबाइल डाऊनलोड : ५0११विभागरिचार्ज तिकीट उत्पन्न म. रेल्वे0१0३२0प. रेल्वे0६0३२५२९ डिसेंबर २०१४ मोबाइल डाऊनलोड : १,२२१विभागरिचार्ज तिकीट उत्पन्न म. रेल्वे0३0२१0प. रेल्वे0५0५५0
तीन दिवसांत ५९ तिकिटे अन् ४३0 रुपये उत्पन्न !
By admin | Updated: December 30, 2014 01:55 IST