दुपारी उन्हाचा तडाखा : परभणीचे तापमान सर्वात कमी १०.२ अंश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात गारेगार झाली आहे, कारण मुंबईचे किमान तापमान सोमवारी १७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत होते. त्यात आता आणखी घसरणच झाली आहे. परिणामी गारव्यात भर पडली आहे.
सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमान परभणी येथे १०.२ अंश नोंदविण्यात आले. मुंबईत नोंदविलेले १७.३ हे किमान तापमान या हंगामातील आतापर्यंतचे नीचांकी किमान तापमान आहे. दुसरीकडे किमान तापमानात घसरण होत असतानाच कमाल तापमान मात्र ३५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. परिणामी सकाळी गारवा तर दुपारी उन्हाचा तडाखा असे काहीसे वातावरण आहे.
* गाेवा, काेकणात पावसाची शक्यता
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात ९ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० डिसेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ११ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. मंगळवारसह बुधवारी मुंबईचे किमान तापमान १८ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
.........................