Join us  

वर्सोव्यात मोफत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माॅडेल टाऊन रेसिडेन्टस वेल्फेअर असोसिएशन व लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ टाय ची ॲन्ड मार्शल आर्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माॅडेल टाऊन रेसिडेन्टस वेल्फेअर असोसिएशन व लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ टाय ची ॲन्ड मार्शल आर्ट (लिट्मा) आयोजित २१ वर्षांखालील शालेय व महाविद्यालयीन मुलींना मोफत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सायंकाळी ४.३० वाजता वर्सोवा मेट्रो स्थानकाजवळील चाचा नेहरू उद्यान सातबंगला येथे देण्यात येणार आहे.

मुख्य शिक्षक ॲलेक्सझेन्डार फर्नांडिस सहकारी सुरेन्द्र यादव ,रवि सिंग, अनुजा रहालकर सदर प्रशिक्षण देणार आहेत. मानसिक जागरूकता आणि आत्मविश्वास वाढविणे, स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण, प्रशिक्षण आणि स्वसंरक्षणातील कौशल्ये, प्रात्यक्षिक प्रश्न आणि उत्तरांचे सत्र अशाप्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचे आयोजन पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर, राजेश ढेरे, अनिल राऊत, संजीव कल्ले, अशोक मोरे यांनी केले आहे.