Join us  

चौथ्या यादीत ४९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 5:21 AM

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा सुरुवातीपासून चर्चेत राहिली आहे.

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा सुरुवातीपासून चर्चेत राहिली आहे. आता अखेरच्या चौथ्या गुणवत्ता यादीत ४९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. तरीही सरतेशेवटी तब्ब्ल ३२ हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशाविना राहिल्याने गोंधळ उडाला आहे. यामुळे मंगळवारी याद्या जाहीर झाल्यानंतर, उपसंचालक कार्यालयात पालक विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबविण्यात येणार असून ती कधी असेल, याची माहिती बुधवारी जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक विभागाने मंगळवारी जाहीर केले.चौथ्या यादीसाठी एकूण ८१ हजार ०६३ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यापैकी केवळ ४९ हजार ०६२ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये चौथ्या यादीत एकूण प्रवेश जाहीर विद्यार्थ्यांमध्ये १५ हजार २४९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे, तर ८ हजार २८२ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय जाहीर करण्यात आले आहे. चौथ्या प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांनी ९ आॅगस्टपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.तिसºया यादीनंतरही सुमारे ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याची माहिती समोर आली आहे. या ३२ हजार विद्यार्थ्यांबरोबरच पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय जाहीर होऊनही प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा प्रश्न कायम असल्याने, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, प्रवेश न मिळालेल्या ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या एकाही फेरीत प्रवेश मिळाला नसल्याची माहितीही समोर आली आहे. प्रवेश न मिळालेले विद्यार्थी तणावाखाली आहेत. मात्र अशा विद्यार्थ्यांसाठीच विशेष फेरी राबवण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.>चौथ्या फेरीतील महाविद्यालयांचे कटआॅफमहाविद्यालयाचे नाव कला विज्ञान वाणिज्यके. सी. ८८. ८३ ८५. ३३ ९०जयहिंद ९१. ३३ ८५. २ ९०. ३३एच. आर. - - ९०एन. एम. - - ८९.२मिठीबाई ८४. ८३ ८५. ८ ८८. ८३आर. ए. पोदार - - ९१. १६रुईया ९३. ८ ९१. २ -रुपारेल ८४. ६ ८८. ४ ८८. ६वझे केळकर ७७. २ ९२. ८ ९०. २मुलुंड - - ८९. १६सेंट झेव्हिअर्स ९७. ५ ८५. ८ -बी. एन. बांदोडकर - ८९. २ -पाटकर ५१ ८८ ८७>सर्वांना प्रवेशकोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, त्यांच्यासाठी विशेष फेरी होईल. बुधवारी यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात येईल.- डॉ. राजेंद्र आहिरे, उपसंचालक, शिक्षण विभाग, मुंबई