Join us

चारही वेदांचे करता येणार आता ई पठण!

By admin | Updated: November 2, 2014 01:48 IST

भारतीय संस्कृतीत अढळ स्थान असलेले चारही वेद आता इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.

मुंबई : भारतीय संस्कृतीत अढळ स्थान असलेले चारही वेद आता इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रलयाने वेदांचे वेबपोर्टल करण्याचा  उपक्रम हाती घेतला असून अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद आणि ऋग्वेद हे चारही वेद दृकश्रव्य माध्यमातून सर्वाच्या भेटीला येणार आहेत.
जगभरातील संशोधक, अभ्यासक आणि विद्याथ्र्याना वेदांचा अभ्यास सहज, सोप्या पद्धतीत उपलब्ध व्हावा या उद्देशाने केंद्र शासनाने हा उपक्रम योजिला आहे. या उपक्रमाकरिता, पाच तज्ज्ञांची विशेष समिती नेमण्यात आली आहे. या समितीत प्रकाश पांडेय यांच्यासह युगल किशोर मिश्र, एम. डी. शर्मा आणि मोरेश्वर घैसास  यांचा समावेश आहे. इंदिरा गांधी संस्कृती कला केंद्र ही संस्था या प्रकल्पाच्या समन्वयकाच्या भूमिकेत आहे. 
वेदांचे हे वेबपोर्टल सुरुवातीला संस्कृत आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते प्रादेशिक भाषांमध्ये सुरू करण्याचा समितीचा मानस आहे. एका वेदाचे ध्वनिमुद्रण करण्यासाठी साधारणत: दीडशे तासांचा कालावधी लागणार असून, चारही वेदांचे ध्वनिमुद्रण करण्यात येईल. 
या वर्षभरात हे पोर्टल जगभरातील वेद अभ्यासकांच्या भेटीला येईल. (प्रतिनिधी)
 
ऋग्वेदाला ‘युनेस्को’चे नामांकन!
च्भारतीय संस्कृतीचे संचित मानल्या जाणा:या वेदांपैकी ‘ऋग्वेद’ या हस्तलिखित वेदाला ‘युनेस्को’ संस्थेचे नामांकन जाहीर झाले आहे. 
च्पुणो येथील भांडारकर ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिटय़ूटमधील ‘ऋग्वेदा’ला ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’ या पुरस्कारासाठी हे नामांकन जाहीर झाले आहे. दरम्यान, यापूर्वीही देशातील तीन महत्त्वाच्या हस्तलिखितांना या पुरस्कारांचे नामांकन मिळाले होते.  
च्पाँडिचेरी येथील शैव हस्तलिखिताला 2क्क्5 साली हा पुरस्कार मिळाला होता. भांडारकर ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये उपलब्ध असलेल्या 28 हजार हस्तलिखितांपैकी तीस ऋग्वेदांतील हस्तलिखितांचा या संग्रहात समावेश आहे. पुण्यातील वैदिक संशोधन मंडळ या संग्रहाचा वापर वैदिक काळाच्या अभ्यासाकरिताही करते.
 
भारतातील भिन्नभिन्न मानवगणांच्या शारीरिक वैशिष्टय़ांचा अभ्यास करून, नऊ उपवंशांसह जे सहा मुख्य भारतवासी मानववंश निश्चित केले गेले आहेत, त्यांतील ‘नॉर्डिक’ या मानववंशातील लोकांनी भारताला संस्कृत वाणीची देणगी दिली, असे म्हणतात. संस्कृत भाषा बोलणा:या मानव समाजाने या भाषेतील अगदी आरंभीची साहित्यनिर्मिती केली. ऋग्वेद,  सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे चार वेद संस्कृत साहित्यातील आहेत. यांतील ऋग्वेद हा संस्कृत साहित्यातील सर्वांत प्राचीन ग्रंथ होय. भारतातील अभ्यासकांनी त्याचा काल इ. स. पू. सुमारे 15क्क् असा ठरविला आहे.