Join us

रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह आढळला....वेस्टर्न

By admin | Updated: August 25, 2014 22:57 IST

रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह आढळला

रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह आढळला
मुंबई: हार्बर रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव या नवीन रेल्वे स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती अंधेरी रेल्वे पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेतला.
सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकादरम्यान एका पुरु षाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृत व्यक्ती अंदाजे ३० वर्ष वयोगटातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हे प्रकरण अंबोली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या सूचनेनंतर मृतदेह शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आला. अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून अंबोली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.